शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
3
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
4
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
5
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
6
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
7
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
8
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
9
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
10
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
11
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
12
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
13
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
14
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
15
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
16
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
17
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
18
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
19
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
20
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेह नेलेली ‘ती’ मोटार जप्त

By admin | Updated: July 26, 2015 00:17 IST

कवलापूर खून प्रकरण : चौकशीसाठी आणखी दोघे ताब्यात; कसून चौकशी

सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथील करण अनिल खेडकर या तरुणाचा खून करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी अटकेत असलेल्या अरुण माळी याने वापरलेली मोटार संजयनगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री जप्त केली आहे. दरम्यान, याप्रकरणी चौकशीसाठी आणखी दोघांना शनिवारी दुपारी ताब्यात घेतले आहे. करणच्या नात्यातील एका महिलेशी संशयित अरुण माळी याचे अनैतिक संबंध होते. करणला याची कुणकुण लागली होती. त्याने अरुणला ‘तू आमच्या नात्यातील महिलेच्या घरी का येतोस? तिच्याशी मोबाईलवर का बोलतोस? अशी विचारणा केली. यातून त्यांच्यात जोरदार वादावादी झाली होती. करण अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याचे लक्षात येताच अरुणने त्याचा कायमचा काटा काढण्याचा बेत आखला होता. त्यानुसार त्याने २१ जुलैरोजी कवलापुरातील महादेव तालमीत करणला बोलावून डोक्यात लाकडी बांबूने प्रहार करून व दोरीने गळा आवळून खून केला होता. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने गावातील किराणा मालाचे व्यापारी विशाल जाधव-सलगरे यांच्या मोटारीचा वापर केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार शुक्रवारी रात्री जाधव यांची मोटार (क्र. एमएच १० एएन १३५०) जप्त केली आहे. याप्रकरणी जाधव यांची चौकशी केली जात आहे. अरुण माळी याने जाधव यांच्याकडू आष्टा (ता. वाळवा) घरातील भाडे घेऊन जात असल्याचे सांगून मोटार नेली होती. मोटार देताना जाधव यांनी जाताना व येताना किती किलोमीटर मोटार धावली, याची नोंद करुन ठेवली आहे. मोटार त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरल्याचे स्पष्ट झाले आहे. शिराळा-बायपास रस्त्यावरील मोरणा पुलाखाली मृतदेह त्याने फेकून दिला होता. करण शांतिनिकेतमधील कला शाखेत अकरावीत शिक्षण घेत होता. घटनेदिवशी तो दुपारी साडेबारा वाजता महाविद्यालयातून बेपत्ता झाला होता. रात्री नऊपूर्वी त्याचा खून झाला असावा, असे पोलिसांनी सांगितले. शनिवारी दुपारी चौकशीसाठी दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. त्यांचा यामध्ये सहभाग आहे का नाही? याची चौकशी केली जात आहे. मृतदेह सापडलेल्या मोरणा पुलाखाली पोलीस पुन्हा पाहणी करण्यासाठी जाणार असल्याचे सांगण्यात आले. अरुण येत्या सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत आहे. (प्रतिनिधी)