सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे धीरज चंद्रकांत सूर्यवंशी, तर उपमहापौरपदी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे गजानन रामू मगदूम यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. पीठासन अधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी निवडीची अधिकृत घोषणा केली. यानंतर दोन्ही पक्षाच्या समर्थकांनी घोषणाबाजी करीत जल्लोष केला.महापालिका निवडणुकीत भाजपला ३९ जागा मिळाल्या होत्या. सभागृहात स्पष्ट बहुमतांसाठी एका जागेची गरज होती. काँग्रेसला १८, राष्ट्रवादी (अजित पवार) १६, शिंदेसेना २, तर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला तीन जागा मिळाल्या होत्या. भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष एकत्र आल्याने संख्याबळ ५५ झाले होते. महापौर पदासाठी भाजपकडून धीरज सूर्यवंशी, तर उपमहापौर पदासाठी गजानन मगदूम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यात विरोधी काँग्रेसने महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे निवडी बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले होते. मंगळवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. या सभेत दोन्ही पदांसाठी एकच अर्ज दाखल झाल्याने सूर्यवंशी व मगदूम यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केले. निवडीनंतर नूतन महापौर, उपमहापौरांचा नरवाडे, आयुक्त सत्यम गांधी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.माजी खासदार संजय पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे, स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश आवटी, दिलीप सूर्यवंशी, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांनीही नूतन महापौर, उपमहापौर यांचे अभिनंदन केले.
अजितदादांच्या आठवणीने उपमहापौर भावुकनूतन उपमहापौर गजानन मगदूम हे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणीने भावुक झाले. मगदूम यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. अर्ज भरण्याच्या शेवटच्या तासात अजितदादांशी त्यांचे बोलणे झाले. राष्ट्रवादीचा एबी फाॅर्मही मिळाला. मगदूम निवडून आले आणि उपमहापौरही झाले. या साऱ्या प्रवासात ते सतत अजितदादांच्या संपर्कात होते. खो-खो संघटनेत ते अजितदादांसोबत सहसचिव म्हणूनही काम केले होते. या साऱ्या आठवणींनी काहीवेळ त्यांच्या तोंडून शब्दही फुटत नव्हते.
Web Summary : Dhiraj Suryavanshi (BJP) became Sangli Mayor, G. Magdum (NCP-Ajit Pawar) deputy unopposed. BJP-NCP coalition secured majority. Magdum recalled his association with Ajit Pawar.
Web Summary : सांगली में भाजपा के धीरज सूर्यवंशी महापौर और राष्ट्रवादी (अजित पवार) के गजानन मगदूम उपमहापौर चुने गए। भाजपा-राकांपा गठबंधन को बहुमत मिला। मगदूम ने अजित पवार के साथ अपने संबंधों को याद किया।