Sangli: विटा नगरपालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढविणार, गोपीचंद पडळकर यांचा निर्धार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 18:20 IST2025-07-07T18:20:17+5:302025-07-07T18:20:46+5:30

विट्यात पदाधिकारी संवाद मेळावा

BJP will contest the Vita Municipality elections on its own MLA Gopichand Padalkar is determined. | Sangli: विटा नगरपालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढविणार, गोपीचंद पडळकर यांचा निर्धार 

Sangli: विटा नगरपालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढविणार, गोपीचंद पडळकर यांचा निर्धार 

विटा : खानापूर विधानसभा मतदारसंघात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका, नगर पंचायतीच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढविणार असून, विटा नगरपालिकेवर भाजपचाच झेंडा फडकविणार आहे, असा निर्धार आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला.

विटा येथे भाजप पदाधिकारी संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पडळकर म्हणाले, खानापूर तालुक्यात लोक गुलामगिरीच्या जोखडात आहेत. त्यांना मुक्त करायचं आहे. खानापूर पंचायत समितीत १८ ते २० वर्षे झाले, तेच ते अधिकारी तळ ठोकून आहेत. ते जनतेची नव्हे, तर नेत्यांची कामे करतात. अशांना वठणीवर आणलं पाहिजे.

विकासकामांचे श्रेय कुणीही घ्या, पण काम झालं पाहिजे. २०२९ ची निवडणूक अजून लांब आहे. तोपर्यंत बरेच पाणी पुलाखालून जाणार आहे. त्यातून काहीजण अख्खे वाहून जातील. आता जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपला एकट्याला निवडणूक लढवायची आहे. आपल्याला सगळीकडे उमेदवार चांगले आहेत. जुन्या आणि नव्या लोकांनी एकत्र येऊन काम करा, असे आवाहन त्यांनी केले.

माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी खानापूर तालुक्यात चांगले काम करणारी भाजपची टीम आहे. एकमेकांचे पाय ओढणारी टीम नाही. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि विटा नगरपालिकेची निवडणूक ताकदीने लढवायची आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागावे, असे आवाहन केले.

वैभव पाटील यांना टोला

विटा पालिका भाजपच्या चिन्हावरच निवडणूक लढवणार आणि जिंकणार आहे. आतापर्यंत भाजप घेऊन तुम्ही इकडे तिकडे पळवायचा. पण ते आता चालणार नाही, असा टोला नव्याने भाजपत प्रवेश केलेल्या माजी आमदार पाटील गटाचे नेते वैभव पाटील यांना आमदार गोपीचंद पडळकर यांनी लगावला.

Web Title: BJP will contest the Vita Municipality elections on its own MLA Gopichand Padalkar is determined.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.