Sangli: मिरजेत सभापती निवडीत भाजपला धक्का; काँग्रेसच्या तन्वी कमलेकर विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 16:43 IST2026-03-10T16:42:35+5:302026-03-10T16:43:02+5:30

काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र सत्तेत 

BJP suffers setback in Miraj Speaker election Congress's Tanvi Kamlekar wins | Sangli: मिरजेत सभापती निवडीत भाजपला धक्का; काँग्रेसच्या तन्वी कमलेकर विजयी

Sangli: मिरजेत सभापती निवडीत भाजपला धक्का; काँग्रेसच्या तन्वी कमलेकर विजयी

मिरज: मिरज पंचायत समिती सभापती, उपसभापतीपदी निवडीत नाट्यमय घडामोडी घडल्या. काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी व शिवसेनेने एकत्र येत भाजपला धक्का दिला. सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या तन्वी कमलेकर यांनी भाजपच्या राणी भोरे यांचा तर उपसभापतीपदी शिंदेसेनेच्या ललिता शेजुळ यांनी भाजपाचे पांडुरंग पाटील यांचा पराभव केला. दोन्ही उमेदवार अकरा विरुद्ध दहा मतांनी विजयी झाले. अपहरण झाल्याची तक्रार झालेले शिंदेसेनेचे एक सदस्य पांडुरंग इंगळे हे मतदानास अनुपस्थित होते. 

मिरज पंचायत समितीच्या २२ सदस्यांपैकी भाजपचे सर्वाधिक दहा सदस्य निवडून आले होते. शिंदेसेनेचे दोन सदस्य  असल्याने शिंदेसेनेच्या मदतीने भाजपचा सभापती निश्चित होता. मात्र दहा सदस्य असलेल्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे तीन, काँग्रेसचे तीन व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे चार असे एकत्र आले. त्यांना शिंदेसेनेच्या सदस्यांनी पाठिंबा देत भाजप उमेदवारांचा पराभव केला. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

तन्वी कमलेकर सर्वात तरुण सभापती  

तन्वी कमलेकर या केवळ २१ वर्षे वयाच्या असून त्या सर्वात तरुण सभापती ठरल्या आहेत. निवडीनंतर खासदार विशाल पाटील, माजी मंत्री अजितरावं घोरपडे,  राष्ट्रवादीचे मनोजबाबा शिंदे, शिंदेसेनेचे मोहन व्हनखंडे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. 

वाचा: तासगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी अरुणा पाटील यांची बिनविरोध निवड

जिल्हा परिषदेतही असाच निकाल दिसेल - विशाल पाटील 

भाजपच्या पैसा व दहशतीचा अंत होण्यास सुरुवात झाली असून मिरज पंचायत समितीत पुरोगामी विचार जिंकला आहे. जिल्हा परिषदेतही असाच निकाल दिसेल असा दावा खासदार विशाल पाटील यांनी केला. 

पैशाचा प्रचंड वापर करून भाजपने निवडणुकीची पद्धतच बदलली आहे. याला रोखण्याचा प्रयत्न मिरज पंचायत समितीत आम्ही केल्याचे माजी मंत्री अजितरावं घोरपडे यांनी सांगितले.

Web Title : सांगली: मिरज में भाजपा को झटका; कांग्रेस की तन्वी कमलेकर विजयी

Web Summary : मिरज पंचायत समिति में कांग्रेस की तन्वी कमलेकर ने भाजपा की रानी भोरे को हराया। गठबंधन के चलते 11-10 से जीत मिली, भाजपा को झटका लगा। 21 वर्षीय कमलेकर सबसे युवा सभापति हैं।

Web Title : BJP loses Miraj election; Congress' Tanvi Kamlekar wins chairperson post.

Web Summary : In a twist, Congress' Tanvi Kamlekar defeated BJP's Rani Bhore for Miraj Panchayat Samiti chairperson. Alliances led to an 11-10 victory, marking a setback for BJP. Kamlekar, 21, is the youngest chairperson.