Sangli ZP Election 2026: भाजप, दोन्ही राष्ट्रवादी, कॉंग्रेसची जमेल तेथे हातमिळवणी; शिंदेसेनेचाही बस्तान बसविण्यासाठी जोर

By संतोष भिसे | Updated: January 24, 2026 19:43 IST2026-01-24T19:39:31+5:302026-01-24T19:43:14+5:30

भाजपचा अध्यक्षपदावर डोळा, सर्वाधिक जागांवर उमेदवार

BJP, NCP Ajit Pawar, Sharad Pawar and Congress parties have announced separate candidate lists for the Sangli Zilla Parishad and Panchayat Samiti elections | Sangli ZP Election 2026: भाजप, दोन्ही राष्ट्रवादी, कॉंग्रेसची जमेल तेथे हातमिळवणी; शिंदेसेनेचाही बस्तान बसविण्यासाठी जोर

Sangli ZP Election 2026: भाजप, दोन्ही राष्ट्रवादी, कॉंग्रेसची जमेल तेथे हातमिळवणी; शिंदेसेनेचाही बस्तान बसविण्यासाठी जोर

संतोष भिसे

सांगली : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी भाजप, दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षांनी आपापल्या स्वतंत्र उमेदवार याद्या जाहीर केल्या आहेत. त्यामुळे आघाडी किंवा युती होण्याची शक्यता निकाली निघाली आहे. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने जमेल तेथे युती, न जमेल तेथे आमनासामना असे धोरण ठेवले आहे.

निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पक्षांना तयारीला वेळच मिळाला नाही. उमेदवारी दाखल करण्याची मुदत सुरू झाली, तरी इच्छुकांच्या मुलाखती झालेल्या नव्हत्या. त्यामुळे अन्य पक्षांसोबत आघाडी किंवा युती करण्यासही त्यांना वेळ मिळाला नाही. परिणामी जमेल तेथे युती-आघाडी आणि अन्यत्र स्वतंत्र लढती असे धोरण अवलंबावे लागले आहे. शिराळा आणि जत तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादींनी हातमिळवणी केली आहे. तर जतमध्ये कॉंग्रेसही त्यांच्यासोबत आहे. अन्यत्र मात्र हे पक्ष स्वतंत्र आहेत. पलूस आणि कडेगाव तालुक्यांत कॉंग्रेसने सर्व जागा स्वतंत्र लढविल्या आहेत.

शिंदेसेनेचाही बस्तान बसविण्यासाठी जोर

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रथमच लढविणाऱ्या शिंदेसेनेने बस्तान बसविण्यासाठी कंबर कसल्याचे दिसते. जिल्हा परिषदेच्या ३२ जागा आणि पंचायत समितीच्या ५० जागांवर उमेदवार उभे केले आहेत. काही ठिकाणी भाजपसोबत युती केली असून उर्वरित ठिकाणी स्वतंत्र लढत देण्याचे धोरण ठेवले आहे.

भाजपचा डोळा अध्यक्षपदावर

भाजपने जिल्हा परिषदेच्या ६१ पैकी ४९ जागा लढवत उमेदवारसंख्येत आघाडी घेतली आहे. अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे सर्वाधिक जागा लढवून बहुमत मिळवायचे आणि अध्यक्षपद ताब्यात घ्यायचे असे धोरण ठेवल्याचे दिसत आहे. मित्रपक्षांना मोजक्याच जागा सोडल्या आहेत. त्या निवडून आल्या, तरी ते पक्ष अध्यक्षपदासाठी दावेदारी करू शकणार नाहीत. तथापि, भाजपला स्पष्ट बहुमत गाठता आले नाही, तर या पक्षांचा टेकू घेता येईल. त्या बदल्यात त्यांना सभापतिपदे देता येतील, असेही डावपेच आहेत.

भाजपची राष्ट्रवादी, शिंदेसेनेसोबत महायुती

भाजपने सर्वाधिक उमेदवार उभे केले असले, तरी काही ठिकाणी महायुतीचे धोरणही अवलंबले आहे. काही मतदारसंघांत शिंदेसेना, रयत क्रांती संघटना आणि जनसुराज्यला जागा सोडल्या आहेत. आटपाडी, जत, खानापूर, कडेगाव, तासगाव, कवठेमहांकाळ आणि पलूस तालुक्यांत सर्व जागांवर स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. वाळवा, शिराळा आणि मिरज तालुक्यात मात्र मित्रपक्षांना काही जागा सोडल्या आहेत.

पक्षनिहाय निवडणूक रिंगणात उभे केलेले उमेदवार

पक्ष  - जिल्हा परिषद - पंचायत समिती
भाजप  -  ४९  - ९९
कॉंग्रेस  - २५  -  ४९
राष्ट्रवादी (शरद पवार) -  २५  -  ५५
राष्ट्रवादी (अजित पवार) - ३१  -  ५८
शिंदेसेना  -  ३२  -  ५०

Web Title : सांगली जिला परिषद चुनाव: पार्टियाँ जहाँ संभव हो गठबंधन कर रही हैं, जीत पर ध्यान केंद्रित

Web Summary : सांगली जिला परिषद चुनावों में गठबंधन खंडित। भाजपा का लक्ष्य वर्चस्व, अधिकांश सीटों पर चुनाव लड़ना और अध्यक्ष पद पर नजर रखना है। शिंदे की सेना भी सत्ता के लिए प्रतिस्पर्धा कर रही है, कुछ गठबंधन बना रही है जबकि अन्य जगहों पर स्वतंत्र रूप से चुनाव लड़ रही है। एनसीपी और कांग्रेस लचीली रणनीतियाँ अपना रही हैं।

Web Title : Sangli ZP Election: Parties Form Alliances Where Possible, Focus on Victory

Web Summary : Sangli ZP elections see fractured alliances. BJP aims for dominance, contesting most seats, eyeing the chairperson post. Shinde's Sena also vies for power, forging some alliances while contesting independently elsewhere. NCP and Congress adopt flexible strategies.