Sangli ZP: व्हिप अन् नियम सांगून भाजपची राष्ट्रवादीवर दादागिरी; जयंत पाटील यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 19:18 IST2026-02-19T19:14:40+5:302026-02-19T19:18:06+5:30

राष्ट्रवादी अजित पवार, शिंदेसेनेचे अस्तित्व स्वतंत्र असल्याचे मत

BJP bullies NCP by telling whip and rules; Jayant Patil criticizes | Sangli ZP: व्हिप अन् नियम सांगून भाजपची राष्ट्रवादीवर दादागिरी; जयंत पाटील यांची टीका

Sangli ZP: व्हिप अन् नियम सांगून भाजपची राष्ट्रवादीवर दादागिरी; जयंत पाटील यांची टीका

सांगली : राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे; मात्र, व्हिप आणि नियम सांगून या पक्षावर भाजपकडून दादागिरी सुरू आहे, अशी टीका माजी पालकमंत्री राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिंदेसेना हे दोन्ही पक्ष भाजपच्या विरोधात लढले होते. त्यामुळे त्यांनी भाजपला पाठिंबा देऊ नये. जर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला तर जनतेतून त्यांची प्रतिमा खराब होईल. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाबरोबर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची आघाडी होती. दुसरीकडे आम्ही शिंदेसेनेच्या विरोधात उमेदवार उभे केले नव्हते. त्यामुळे सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये हे दोन्ही पक्ष आमच्यासोबत येतील, अशी आमची अपेक्षा आहे. दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजप अशा संभाव्य आघाडीबाबत ते म्हणाले की, स्वप्नातील गोष्टी आणि जर-तरच्या शक्यतांविषयी बोलणे राजकारणात उचित नसते.

दोन्ही बाजूंनी हालचाली वाढल्या

जिल्हा परिषदेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्यामुळे सत्ता स्थापनेचा संघर्ष निर्माण झाला आहे. जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानंतर भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हाती दोर

जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीतील सर्व पक्ष एकमेकांच्या विरोधात आहेत आणि तीव्र टीका झाली आहे. विशेषतः शिंदेसेना आणि भाजप नेत्यांमध्ये आटपाडी, खानापूर तालुक्यात संघर्ष झाला आहे. या वादावर पडदा टाकण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे सोमवारनंतर मुंबईत बैठक घेऊन महायुतीतील नेत्यांमधील वाद संपवून जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापन करण्याचा सल्ला देतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

जिल्हा परिषदेत महायुतीचीच सत्ता : सम्राट महाडिक

केंद्र आणि राज्यात महायुतीची सत्ता असून, त्याच सूत्रानुसार सांगली जिल्हा परिषदेतही महायुतीचीच सत्ता येणार आहे. राज्यात अनेक निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढूनही सत्ता स्थापनेत महायुती आहे. जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेसाठी शिंदेसेना, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या नेत्यांशी चर्चा झाली आहे. भाजपचे नेते व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि शिंदेसेनेचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक मुंबईत सोमवारनंतर होणार आहे. या बैठकीत महायुतीवर शिक्कामोर्तब होईल, अशी अपेक्षा भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी व्यक्त केली.

एकनाथ शिंदे यांचा आदेश मान्य : सुहास बाबर

जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी महायुती की महाविकास आघाडीकडे जायचे याबाबतचा निर्णय शिंदेसेनेचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच घेतील. सात सदस्य एकत्रित आहेत आणि वरिष्ठांचा निर्णय मान्य असणार आहे. सोमवारी आम्ही मुंबईत भेटणार आहोत. या बैठकीनंतर सत्ता स्थापनेबाबत बैठक होणार आहे, असे शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी सांगितले.

Web Title : सांगली ZP: व्हिप और नियमों से भाजपा की राष्‍ट्रवादी पर दादागिरी: जयंत पाटिल

Web Summary : जयंत पाटिल ने व्हिप और नियमों का उपयोग करके राष्‍ट्रवादी (अजित पवार गुट) पर भाजपा के प्रभुत्‍व की आलोचना की। सांगली ZP चुनावों के लिए गठबंधन तरल हैं। महायुति का लक्ष्‍य शिंदे सेना के समर्थन से सरकार बनाना है। निर्णय एकनाथ शिंदे पर निर्भर करता है।

Web Title : Sangli ZP: BJP's dominance over NCP using whip, rules: Jayant Patil

Web Summary : Jayant Patil criticizes BJP for dominating NCP (Ajit Pawar faction) using whip and rules. Alliances are fluid for Sangli ZP elections. Mahayuti aims to form government with Shinde Sena's support. Decision rests with Eknath Shinde.