शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भिलवडी पाणी योजनेचा पंचनामा

By admin | Updated: May 7, 2015 00:31 IST

अधिकाऱ्यांकडून पाहणी : ठेकेदारांवर फौजदारीचा इशारा

भिलवडी : दोन कोटी रूपये खर्चूनही गेल्या दोन वर्षांपासून रेंगाळलेल्या भिलवडी येथील नळपाणीपुरवठा योजनेचे कामकाज जूनपर्यंत पूर्ण न केल्यास संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी दिला.मुदत संपून गेली तरीही पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण न झाल्याने भिलवडीकरांना अशुध्द व दूषित पाणीपुरवठा होत आहे. याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करुनही ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी तसेच प्रशासनाने याची दखल घेतली नाही. मात्र वारंवार नागरिकांच्या येणाऱ्या तक्रारींमुळे अचानक मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी दखल घेत मंगळवारी सायंकाळी अचानक भिलवडीस भेट दिली. यावेळी त्यांनी पिण्याच्या पाण्याची टाकी, जलशुध्दीकरण प्रकल्पास भेट दिली. यावेळी पाण्याचे नमुने पाहिल्यानंतर त्यांनी हे पाणी जनावरांना पिण्यालायकही नाही, मग माणसांना कसे पिण्यास देता?, अशा शब्दात ग्रामसेवक व पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. दोन कोटी रूपये खर्चून नव्याने सुरू केलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम का रेंगाळले, याची तपशीलवार माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली. जूनपर्यंत ही योजना पूर्ण न केल्यास संबंधित ठेकेदाराचा काळ्या यादीमध्ये समावेश करण्यात येईल, तसेच ठेकेदारासह संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.जलशुध्दीकरण प्रकल्पाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य पाहून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रासही भेट देऊन कामकाजाची पाहणी केली.यावेळी पलूस पंचायत समितीचे सभापती विजय कांबळे, गटविकास अधिकारी रमेश जोशी, भिलवडीचे सरपंच राहुल कांबळे, माजी सरपंच शहाजी गुरव, उपसरपंच दादासाहेब चौगुले, मोहन तावदर, राजन कु लकर्णी उपस्थित होते. (वार्ताहर)टक्केवारीत रेंगाळलेली योजना...जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने भिलवडीतील काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या टोळीला हाताशी धरून कोणत्याही कामाचे मूल्यमापन न करता परस्पर लाखो रुपयांची बिले खर्ची टाकून पैशाची उधळपट्टी केल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. एकूण कामाच्या रकमेच्या तीस ते पस्तीस टक्क्यांपेक्षा जादा रकमेचा भ्रष्टाचार झाल्याने निधी अपुरा पडल्याने कामकाज रेंगाळत आहे.