शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा क्रांती मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:24 IST

मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विलास देसाई, डॉ. संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. समाजाच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री ...

मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विलास देसाई, डॉ. संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. समाजाच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पाठविण्यात आले.

आंदोलनात आ. सुधीर गाडगीळ, काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील, मंगेश चव्हाण, भाजपचे पृथ्वीराज पवार, नगरसेवक धीरज सूर्यवंशी आदी सहभागी झाले होते.

शासनाने घोषित केल्याप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ५० टक्के शुल्कमाफी दिली जात नाही. शासनाने ५० टक्के शुल्क माफीचे आदेश त्वरित द्यावेत. जिल्ह्यातील मुला-मुलींचे वसतिगृह मागील एक वर्षापासून बंद असून कायमस्वरूपी वसतिगृह निर्माण करावीत. समांतर आरक्षणमधील ड़िसेंबर २०१८ चा शासननिर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू केल्याने व सर्वोच्च न्यायालय विविध शासन निर्णयांच्या निर्देशाचे पालन न केल्याने अन्याय झालेल्या सर्व मराठा महिला उमेदवारांना शासकीय सेवेत समावून घ्यावे. मराठा आरक्षण स्थगितीपूर्वी ज्या निवड प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत, अशा सर्व विभागातील उमेदवारांना तात्काळ नियुक्त्या द्याव्यात. सारथी संस्थेला आवश्यक असणारे सक्षम प्रकल्प अधिकारी व मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. १०२ व्या घटनादुरुस्तीअन्वये ३६६ मधील २६ (सी) नुसार करण्यात आलेल्या व्याख्येच्या आधारे ३४३ अ नुसार ओबीसी समूहाचे जातनिहाय फेरसर्वेक्षण करावे. ओबीसींचे शासकीय सेवामधील जातनिहाय प्रतिनिधित्व व आरक्षणाचे लाभ घेऊन खुल्या प्रवर्गातून मिळालेल्या अतिरिक्त लाभाचे सर्वेक्षण करून श्वेतपत्रिका काढण्याची गरज आहे. ओबीसी समूहाचे वर्गीकरण करावे. तसेच घटनापीठासमोर योग्य युक्तिवाद करण्यासाठी केंद्र शासनाकडून स्पष्टीकरण मागवून आरक्षणाचा अडथळा दूर करण्याच्या मागणीसाठी क्रांती मोर्चातर्फे आंदोलन केले.

आंदोलनात किरण पाटील, महेश खराडे, नितीन चव्हाण, सतिश साखळकर, विश्वजित पाटील, शहाजी भोसले, अजय देशमुख, नरेंद्र मोहिते, प्रशांत भोसले, राहुल पाटील, श्रीरंग पाटील, धनंजय पिसे, अभिजित शिंदे, अशोक पाटील, दिग्विजय मोहिते, प्रमोद जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.