शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

जत पूर्वच्या द्राक्ष, डाळिंब बागांना टॅँकरचाच आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 19:26 IST

जत पूर्व भागात यंदाच्या डाळिंब व द्राक्ष हंगामात सुरुवातीपासूनच टँकरने पाणी द्यावे लागत आहे. पूर्वी २० हजार लिटर पाण्याचा टँकर अडीच हजार रुपयांना मिळायचा, तोच टॅँकर सध्या साडेतीन हजार रुपये झाला आहे. दर वाढला असला, तरी बागांना टॅँकरच्या पाण्यामुळे आधार मिळाला आहे.

ठळक मुद्देजत पूर्वच्या द्राक्ष, डाळिंब बागांना टॅँकरचाच आधारखर्चात टॅँकरमुळे दुप्पट वाढ

गजानन पाटील संख : जत पूर्व भागात यंदाच्या डाळिंब व द्राक्ष हंगामात सुरुवातीपासूनच टँकरने पाणी द्यावे लागत आहे. पूर्वी २० हजार लिटर पाण्याचा टँकर अडीच हजार रुपयांना मिळायचा, तोच टॅँकर सध्या साडेतीन हजार रुपये झाला आहे. दर वाढला असला, तरी बागांना टॅँकरच्या पाण्यामुळे आधार मिळाला आहे.पावसाने दडी दिल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. एकरी खर्चात दुप्पट वाढ झाली आहे. द्राक्ष, डाळिंब बागा धोक्यात आल्या आहेत. उत्पादन काहीच मिळणार नसल्याने बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे. जत तालुक्यात द्राक्षाचे क्षेत्र ४ हजार ८७० हेक्टर, डाळिंबाचे क्षेत्र ११ हजार ३४४.५९ हेक्टर आहे.

तालुक्यात गेल्यावर्षी पाऊस झाला नसल्याने द्राक्ष, डाळिंब बागा अडचणीत आल्या आहेत. यावर्षी पाणी कमी असल्याने पावसाच्या भरवशावर द्राक्ष बागा व डाळिंब बागांचा बहर धरला होता; परंतु परतीचा पाऊस न झाल्याने कूपनलिका, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. सध्या दरीबडची, सिध्दनाथ, उमदी परिसरातील शेतकरी टॅँकरचे पाणी घालून बागा जगवत आहेत.पूर्व भागातील उमदी, सिध्दनाथ परिसरातील बागायतदार बेदाणा, द्राक्षाचे दर्जेदार उत्पादन घेतो, तर डाळिंबाचे दरीबडची परिसरात दर्जेदार उत्पादन घेतले जाते. पाणी नसल्याने डाळिंब व द्राक्ष बागा अडचणीत आल्या आहेत. शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

तालुक्यातील पश्चिम, दक्षिण व उत्तर भागात म्हैसाळ योजनेचे पाणी आले आहे, परंतु पूर्व भागातील ६५ गावे अद्याप पाण्यापासून वंचित आहेत. तालुक्यात सध्या पिण्याच्या पाण्याची, जनावरांच्या पाण्याची व चाऱ्यांची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.गेल्या चार वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाले आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे. सध्या मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथून टॅँकरने पाणी आणून बागांना दिले जात आहे. दरीबडची परिसरातील शेतकऱ्यांना टॅँकर भरायलाही पाणी नाही. कूपनलिका, तलाव शेजारी असलेल्या विहिरीतून पाणी भरले जात आहे. त्यामुळे बागा जगवणे जिकिरीचे बनले आहे.द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना वर्षभर एकरी एक ते दोन लाख खर्च येतो. या खर्चात टॅँकरमुळे दुप्पट वाढ झाली आहे. पाणी पुरेसे नसल्याने उत्पन्नही घटत आहे. बेदाण्याला बाजारात कमी दर मिळत आहे. यामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.

टॅग्स :WaterपाणीSangliसांगली