शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

बंदीमुळे भाकड जनावरे कर्नाटकात

By admin | Updated: August 11, 2015 00:35 IST

गोवंश हत्या बंदीचा परिणाम : मिरजेत जनावरांची आवक निम्म्यावर

सदानंद औंधे - मिरज -गोवंश हत्या बंदीमुळे मिरजेत जनावरे बाजारातील उलाढालीवर परिणाम झाला आहे. भाकड जनावरांची कर्नाटकात मोठ्या प्रमाणात निर्यात सुरू असल्याने मिरजेच्या बाजारात जनावरांची आवक निम्म्यावर आली आहे. मिरजेत दर बुधवारी भरणाऱ्या बाजारात जनावरे खरेदी-विक्रीची मोठी उलाढाल होती. गोवंश हत्याबंदी कायद्याच्या अंमलबजावणीनंतर मिरजेच्या बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या गाय, जर्सी गाय, बैल आदी जनावरांचे प्रमाण घटले आहे. कर्नाटकात बंदी नसल्याने ही जनावरे विक्रीसाठी कर्नाटकात नेण्यात येत आहेत. कर्नाटकातील अथणी, मुडलगी, जमखंडी, बोरगाव, बेळंकी, अंकली येथील जनावरांच्या बाजारात भाकड जनावरांच्या खरेदी-विक्रीमुळे उलाढाल वाढली आहे. मिरजेत जनावरे खरेदी करणाऱ्या मांस विक्रेत्यांना पोलीस चौकशीला तोंड द्यावे लागत असल्याने मांस विक्रेत्यांनी मिरजेत भाकड जनावरे खरेदी बंद केली आहे. गाय व बैलांची वाहतूक करताना कापण्यासाठी विक्रीला नेत असल्याच्या संशयावरून वाहने अडविण्यात येत असल्याने रात्रीच्यावेळी चोरून जनावरांची कर्नाटकात वाहतूक सुरू आहे. मिरजेसह कऱ्हाड, फलटण, सातारा, कोल्हापूर येथील जनावरे बाजारातही भाकड जनावरांची आवक घटली आहे. भाकड जनावरांची खरेदी-विक्री सीमाभागातील बाजारात जोरदार सुरू आहे. प्रतिबंध असलेली जनावरे वगळून म्हैस, रेडा, जर्सी गाय आदी जनावरांची आवक होत असल्याने मिरजेच्या जनावरे बाजारातील उलाढाल निम्म्यावर आली आहे. त्यातच पाऊस व पेरणीच्या हंगामाच्या प्रतीक्षेत जनावरांची आवक आणखीन घटली आहे. बाजारातील एकूण उलाढालीपासून ०.८ टक्के उत्पन्न बाजार समितीला मिळते. बाजारातील उलाढाल कमी झाल्याने बाजार समितीच्या उत्पन्नातही घट झाली आहे.