इस्लामपुरात राष्ट्रवादी डॉक्टर सेलतर्फे कोरोना लसीवर प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:28 IST2021-04-09T04:28:07+5:302021-04-09T04:28:07+5:30

इस्लामपूर येथे जागतिक आरोग्य दिनानिमित्त राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या वतीने कोरोना लस घेतलेल्या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. लोकमत न्यूज नेटवर्क ...

Awareness on Corona Vaccine by Nationalist Doctor Cell in Islampur | इस्लामपुरात राष्ट्रवादी डॉक्टर सेलतर्फे कोरोना लसीवर प्रबोधन

इस्लामपुरात राष्ट्रवादी डॉक्टर सेलतर्फे कोरोना लसीवर प्रबोधन

इस्लामपूर येथे जागतिक आरोग्य दिनानिमित्त राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या वतीने कोरोना लस घेतलेल्या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूूर : येथील वाळवा तालुका आणि इस्लामपूर शहर राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या वतीने जागतिक आरोग्य दिनानिमित्त कोरोना प्रतिबंधक लसीबाबत प्रबोधन करण्यात आले. डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

जागतिक आरोग्य दिनानिमित्त ज्यांनी लसीकरण करून घेतले आहे, त्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. मल्टिस्पेशालिटी रुग्णालयातील लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. तसेच शहरामध्ये कोरोना लसीकरणाबाबत प्रबोधन करणारे फलक लावण्यात आले.

यावेळी मुख्याधिकारी अरविंद माळी, उपजिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. नरसिंह देशमुख, डॉ. राणोजी शिंदे, डॉ. जावेद मगदूम, डॉ. मुबीन मोमीन उपस्थित होते. सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अतुल मोरे, तालुकाध्यक्ष डॉ. अनिल माळी, शहराध्यक्ष डॉ. दिलीप साळुुंखे, डॉ. अमित सूर्यवंशी, डॉ. विनय राजमाने, डॉ. सुनील पाटील यांनी संयोजन केले.

Web Title: Awareness on Corona Vaccine by Nationalist Doctor Cell in Islampur