औटेवाडी, धावडवाडी डोंगराला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:23 IST2021-03-07T04:23:37+5:302021-03-07T04:23:37+5:30

खरसुंडी : औटेवाडी (ता. आटपाडी) येथील डोंगराला आग लागली. यामध्ये वनविभाग व खासगी जागेतील सुमारे ३५ एकरावरील झाडेझुडपे ...

Autewadi, Dhavadwadi mountain fire | औटेवाडी, धावडवाडी डोंगराला आग

औटेवाडी, धावडवाडी डोंगराला आग

खरसुंडी : औटेवाडी (ता. आटपाडी) येथील डोंगराला आग लागली. यामध्ये वनविभाग व खासगी जागेतील सुमारे ३५ एकरावरील झाडेझुडपे जळून खाक झाली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

किरण पवार, संजय गायकवाड, उमेश आवटे, पांडुरंग पवार, रणजित आवटे, विशाल आवटे, अमोल आवटे, दुर्योधन निकम, अण्णा माने, सत्यवान निकम, निहाल निकम, विजय आवटे यांच्यासह तरुणांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. वन विभाग अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली

जिल्हा परिषद सदस्य ब्रम्हानंद पडळकर, पंचायत समिती सभापती डॉ. भूमिका बेरगळ, उपसभापती दादासाहेब मरगळे, जयवंत सरगर, चंद्रकांत पावणे, जगन्नाथ पडळकर यांनी पाहणी केली. माजी सरपंच पांडुरंग पवार यांनी रानडुकरांमुळे शेतकऱ्यांचे नेहमीच नुकसान होत असते. त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली.

Web Title: Autewadi, Dhavadwadi mountain fire