शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
5
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
6
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
7
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
8
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
9
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
10
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
11
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
12
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
13
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
14
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
15
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
16
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
17
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
19
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
20
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

खोट्या कागदपत्रांद्वारे शिक्षण संस्था बळकाविण्याचा प्रयत्न

By admin | Updated: December 19, 2014 23:50 IST

राष्ट्रवादीच्या माजी अध्यक्षासह सहाजणांवर गुन्हा

आटपाडी : आटपाडी येथील मॉडर्न एज्युकेशन सोसायटी ही संस्था बळकाविण्याच्या उद्देशाने खोटी कागदपत्रे, खोटे शिक्के, खोटी रजिस्टर तयार करुन संस्था, सभासद आणि कर्मचाऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी आज आटपाडी न्यायालयाने राष्ट्रवादीचे खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे माजी अध्यक्ष विष्णूपंत तातोबा चव्हाण (रा. य. पा. वाडी) यांच्यासह सहाजणांविरुध्द गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश आटपाडी पोलिसांना शुक्रवारी दिले.याप्रकरणी पोलिसांनी चव्हाण यांच्यासह रावसाहेब मारुती पाटील (रा. आटपाडी), विष्णू एकनाथ कवठेकर (रा. य. पा. वाडी), जयदीप मोहनराव भोसले (रा. नेलकरंजी), आप्पासाहेब बाबा काळेबाग (रा. आटपाडी) आणि विठ्ठल परशुराम विभुते (रा. माडगुळे) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.मॉडर्न एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची ग. दि. मा. हायस्कूल माडगुळे, पिंपरी हायस्कूल, पिंपरी (खुर्द), घाणंद हायस्कूल व प्रा. टी. ए. चव्हाण उच्च माध्यमिक विद्यालय घाणंद, मा. अं. मो. भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नेलकरंजी ही चार हायस्कूल आहेत. या शाळांचे व्यवस्थापन संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाकडून केले जाते. २0१२ ते २0१७ या कालावधीकरिता निवडण्यात आलेले विश्वस्त मंडळ कार्यरत असून, मुख्य विश्वस्त अजित तुकाराम चव्हाण (रा. य. पा.वाडी) आहेत. या मंडळाच्या बदल अर्जास जॉर्इंट कमिशनर, कोल्हापूर यांनी मनाई आदेश दिला होता. या आदेशाची कल्पना विष्णू चव्हाण यांच्यासह सहाजणांनी होती. परंतु संस्था बळकावण्याच्या उद्देशाने त्यांनी आपणच संस्थेचे विश्वस्त मंडळ आहे असे खोटा अर्ज तयार केला. तो मुख्याध्यापक, शिक्षणाधिकाऱ्यांना सादर केला. याविरुध्द अजित चव्हाण यांनी आटपाडी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने पोलिसांना चव्हाण यांच्यासह सहाजणांविरुध्द भारतीय दंडसंहिता कायदा कलम ४0६, ४२0, ४६४, ४६५, ४६७, ४६८, ४७१ आणि ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार पवार करीत आहेत. (वार्ताहर)पदाधिकारी अडचणीतआज गुन्हा झालेले विष्णुपंत चव्हाण हे राष्ट्रवादीचे विधानसभा मतदारसंघाचे माजी अध्यक्ष होते, तर जयदीप भोसले हे सध्या काँग्रेसच्या कार्यकारिणीवर असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जि. प.चे माजी उपाध्यक्ष कै. मोहनराव भोसले यांचे चिरंजीव आहेत.आप्पासाहेब काळेबाग हे भाजपचे निष्ठावंत आणि विधानसभा निवडणूक लढविलेले उमेदवार आहेत.