शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

इटकरेत जमावाचा हॉटेलवर हल्ला

By admin | Updated: November 19, 2014 00:19 IST

दोघे ताब्यात : वाहनांची मोडतोड; राष्ट्रपुरुषाच्या अर्धपुतळ्याची भांडणात मोडतोड

कामेरी/येलूर : किरकोळ कारणावरून दोघा व्यावसायिकांत  झालेल्या धक्काबुक्कीत चुकून राष्ट्रपुरुषाचा अर्धपुतळा फुटल्याने त्याचे पर्यवसान तोडफोडीत झाले. इटकरे (ता. वाळवा) येथे आज, मंगळवारी ही घटना घडली. अर्धपुतळा मोडतोडीचा प्रसार सोशल मीडियावरून झाल्यानंतर सायंकाळी संतप्त जमावाने या दोन्ही व्यावसायिकांच्या दुकानांवर हल्ला केला. हॉटेलमधील साहित्याची नासधूस व वाहनांची मोडतोड केली. सध्या गावात तणाव असल्याने बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. येडेनिपाणी फाट्यावर पानटपरी व त्याशेजारी किरकोळ खाद्यपदार्थांचे हॉटेल आहे. पानटपरीत राष्ट्रपुरुषाचा अर्धपुतळा होता. आज दुपारी दोनच्या दरम्यान या दोन्ही व्यावसायिकांत किरकोळ कारणावरून वाद झाला. त्याचे पर्यवसान धक्काबुक्कीत झाले. या धक्काबुक्कीत अर्धपुतळा खाली पडल्याने फुटला. त्याचे छायाचित्रण करून सोशल मीडियाद्वारे प्रसारित करण्यात आले. यामुळे चारशेहून तरुणांचा जमाव येडेनिपाणी फाट्यावर आला. जमावाने हॉटेलवर हल्ला केला. सर्व साहित्याची मोडतोड केली. काही साहित्य रस्त्यावर आणून फेकले. त्यानंतर जमाव हॉटेल व्यावसायिकाच्या इटकरेतील घरावजळ गेला. तेथील तीन मोटारींची (एमएच ०९ ई १४०४ व एमएच १० एक्यू ८३८ आणि एमएच ०९ सीएच ६०९१) मोडतोड करण्यात आली. हातात काठ्या घेऊन जमावाने धुमाकूळ घातल्याने तणाव निर्माण झाला.या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक आनंद पाटील फौजफाट्यासह दाखल झाले. त्यांनी जमावाचा पाठलाग करून लोकांना पांगवले. गावात तणाव असल्याने सर्व व्यवहार बंद होते. अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मीकांत पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. सायंकाळनंतर तणावपूर्ण शांतता होती. जिल्'ातील पोलीस पथक बंदोबस्तासाठी दाखल झाले आहे. गावातून फिरणाऱ्या तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.दोन्ही व्यावसायिकांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यांच्या कुटुंबांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे अतिरिक्त पोलीसप्रमुख लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले की, ग्रामस्थांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. या घटनेचा कोणी जाणीवपूर्वक प्रसार करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांची गय केली जाणार नाही. (प्रतिनिधी)संशयितांची नावे निष्पन्न करूजिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत मुंबईत आहेत. या घटनेची त्यांनी दूरध्वनीवरून माहिती घेतली. ते म्हणाले की, किरकोळ भांडणातून हा प्रकार घडला आहे. मात्र, त्याचा सोशल मीडियावरून कोणी प्रसार केला, वाहनांची मोडतोड कोणी केली, याचा तपास करून सर्वांची नावे निष्पन्न करू आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करू. या घटनेचे जिल्ह्यात कोठेही पडसाद उमटू नयेत, याची काळजी घेतली आहे.