शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
3
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
4
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
5
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
6
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
7
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
8
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
9
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
11
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
12
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
13
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
14
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
15
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
16
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
17
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
18
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
19
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
20
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

मानद वन्य जीव रक्षक पदांवर आता महिलांच्याही नियुक्त्या, निवडीची प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 18:09 IST

तालुकास्तरावरही नियुक्त्या

सांगली : मानद वन्य जीव रक्षक पदांवर आता महिलांच्याही नियुक्त्या केल्या जाणार आहेत. राज्याच्या वन विभागाने तसा निर्णय घेतला असून त्यासाठी अर्जही मागविले आहेत. राज्यात या पदांवर प्रथमच महिलांच्या निवडी केल्या जात आहेत.सध्या प्रत्येक जिल्ह्याला एक पुरुष मानद वन्य जीव रक्षक कार्यरत आहे. या पदाचा कार्यकाल तीन वर्षांचा असतो. तो नुकताच संपल्याने नव्याने अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी राज्यभरातून पुरुष वन्य जीव कार्यकर्त्यांनी अर्ज केले. यादरम्यान, या पदांवर महिलांचीही नियुक्ती करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला. त्यामुळे पुरुषांचे अर्ज रद्दबातल करण्यात आले.महिलांच्या समावेशासह नव्याने अर्ज मागविण्यात आले. सध्या निवडीची प्रक्रिया सुरू आहे. वन्य जीव संरक्षण कामात महिलांचाही सहभाग असावा या हेतूने महिलांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. राज्यभरात वन्य जीव क्षेत्रात महिला कार्यकर्त्यांचे प्रमाणात तुलनेने कमी आहे. त्यामुळे आजवर पुरुष कार्यकर्तेच या पदासाठी अर्ज करायचे. मानधन अथवा वेतनाशिवाय स्वयंसेवी स्वरूपात हे काम करावे लागते. मात्र त्याला कायदेशीर अधिकार मोठे आहेत.तालुक्यालाही रक्षक नेमणारआजवर प्रत्येक जिल्ह्याला एक मानद वन्य जीव रक्षक होता. नव्या निर्णयानुसार आता तालुक्यांनाही प्रत्येकी किमान दोन वन्य जीव रक्षक नियुक्त केले जाणार आहेत. जिल्ह्याचा वन्य जीव रक्षक जिल्हाभरात पोहोचून काम करण्यावर मर्यादा येत असल्याने तालुक्यांनाही नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला. राज्यभरात या पदांवर महिलांसाठी ५० टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या संपली असून निवडीची प्रक्रिया सुरू आहे. सांगली जिल्ह्यासाठी १८ पुरुष आणि ७ महिलांचे अर्ज आले आहेत. जिल्ह्याची संख्याही एकवरून दोन केली जाणार आहे.

मानद वन्य जीव रक्षक पदासाठी नियुक्ती प्रक्रिया सध्या सुरू आहे. जून महिन्यात अर्ज मागविण्यात आले असून त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. महिलांनाही या पदावर नियुक्तीचा निर्णय शासनाने घेतला आहे. - अजितकुमार पाटील, माजी मानद वन जीव रक्षक, सांगली

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra to Appoint Women as Honorary Wildlife Wardens

Web Summary : Maharashtra Forest Department will now appoint women as honorary wildlife wardens. Applications are invited, marking a first for the state. Each subdistrict will have two wardens, with 50% reservation for women, to boost wildlife protection.