कुची येथे जिल्हा बॅंकेच्या शाखेचा वर्धापन दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:50 IST2021-03-04T04:50:13+5:302021-03-04T04:50:13+5:30

यावेळी बँकेचे तालुका विभागीय अधिकारी पी. डी. पाटील म्हणाले, ग्राहकांचे सहकार्य, योगदान व विश्वास लाभल्याने या शाखेने मोठी प्रगती ...

Anniversary of District Bank Branch at Kuchi | कुची येथे जिल्हा बॅंकेच्या शाखेचा वर्धापन दिन

कुची येथे जिल्हा बॅंकेच्या शाखेचा वर्धापन दिन

यावेळी बँकेचे तालुका विभागीय अधिकारी पी. डी. पाटील म्हणाले, ग्राहकांचे सहकार्य, योगदान व विश्वास लाभल्याने या शाखेने मोठी प्रगती केली आहे. त्यामुळे आजअखेर ३७ कोटी ५१ लाख रुपयांच्या ठेवी व १७ कोटी ५१ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.

सरपंच वैशाली पाटील म्हणाल्या, सभासद व ग्राहकांचा विश्वास संपादन करून बॅंकेने मोठी प्रगती केली आहे. ग्राहकांनी शासकीय योजना तसेच बँकेच्या गृहकर्ज व इतर योजनांचा लाभ घ्यावा. शामराव पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्राहकांच्या अडचणींबाबत शंकांचे निरसनही करण्यात आले. यावेळी उपसरपंच विजय पाटील, माजी सरपंच वसंतराव माळी, बाबूराव जाधव, अशोक पवार, हिंदुराव पाटील, अनिल हसबे, दिलीप पाटील, सदाशिव पाटील, बचत गटाच्या महिला, ग्राहक व बँकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. फिल्ड ऑफिसर एम. बी. पाटील यांनी स्वागत केले. मोहन पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Anniversary of District Bank Branch at Kuchi