शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

मिरज पंचायत समितीत हमरीतुमरी

By admin | Updated: September 11, 2015 00:53 IST

विशेष सभा : सांगली बाजार समिती स्वीकृत सदस्य पदावरून संघर्ष

मिरज : मिरज पंचायत समितीच्या विशेष सभेत बाजार समितीच्या स्वीकृत संचालक पदासाठी काँग्रेस सदस्यांनी बहुमताच्या बळावर नरवाडचे सदस्य बाबासाहेब कांबळे यांच्या नावाचा ठराव केला व सभेत गुप्त मतदानावरून व तहकूब सभा घेण्यावरून सत्ताधारी व विरोधी सदस्यांत हमरीतुमरी झाली. सभापती दिलीप बुरसे यांनी गुप्त मतदानाची मागणी फेटाळल्याने, विरोधी राष्ट्रवादी सदस्यांनी सभात्याग केला. बाजार समितीच्या स्वीकृत संचालक पदाच्या ठरावासाठी मिरज पंचायत समितीत सदस्यांची विशेष सभा बोलावण्यात आली होती. पंचायत समितीतून एका सदस्याच्या नावाची शिफारस होणार असल्याने, सत्ताधारी काँग्रेस सदस्यांत अनेक इच्छुक होते. सभेपूर्वी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अमर पाटील यांनी सदस्यांची बैठक घेतली. या बैठकीत माजी सभापती अशोक मोहिते ठरावासाठी इच्छुक होते, मात्र अमर पाटील यांनी, पंचायत समितीची पदे मिळालेल्यांना संधी न देण्याची भूमिका घेतल्याने बरीच खलबते झाली. अखेर नरवाडचे बाबासाहेब कांबळे यांच्या नावावर एकमत झाले. सकाळी ११ वाजता होणारी सभा सभापती दिलीप बुरसे यांनी तब्बल तीन तासांच्या विलंबानंतर २ वाजता घेण्याचा प्रयत्न केला. विरोधी सदस्यांनी सभेच्या विलंबाबाबत जाब विचारल्यानंतर, कोरमअभावी तहकूब केलेली सभा घेत असल्याचा पवित्रा सभापतींनी घेतला. यावरून काँग्रेस सदस्य व विरोधी राष्ट्रवादीच्या सदस्यांत हमरीतुमरी झाली. विरोधकांच्या मागणीनुसार तहकूब सभा ३ वाजता घेण्यात आली. विरोधकांनी सभेच्या सुरुवातीस तहकूब सभेच्या इतिवृत्ताची मागणी केली. इतिवृत्त उपलब्ध नसल्याने काही वेळ सभेचे कामकाज रेंगाळले. सभेत पक्षबैठकीत ठरल्याप्रमाणे स्वीकृत संचालक पदासाठी काँग्रेस सदस्य आबासाहेब चव्हाण यांनी बाबासाहेब कांबळे यांचे नाव सुचविले. त्यास प्रवीण एडके यांनी अनुमोदन दिले. विरोधी गटातून राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते अरुण राजमाने यांचे नाव भाजपचे सदस्य सतीश नीळकंठ यांनी सुचविले. त्यास शंकर पाटील यांनी अनुमोदन दिले. हात वर करुन मतदान होईल, असे सभापती दिलीप बुरसे यांनी सांगितले. याला विरोधी गटाचे अरुण राजमाने, सतीश निळकंठ, शंकर पाटील यांनी विरोध दर्शवित गुप्त मतदानाची जोरदार मागणी केली. सभापती बुरसे यांनी, काँग्रेस सदस्यांची मागणी असल्याने मतदान हात वर करुनच होईल, अशी भूमिका घेत गुप्त मतदानाची मागणी फेटाळली. यावरून सत्ताधारी सदस्य व विरोधी सदस्यांत वादावादी, हमरीतुमरी झाली. बहुमताच्या बळावर अन्याय केल्याचा आरोप करीत विरोधकांनी सभात्याग केला. सभेत काँग्रेसच्या सभापतींसह १२, तर विरोधी राष्ट्रवादीचे ६ व भाजपचा एक असे सदस्य उपस्थित होते. ११ विरुध्द सात मतांनी बाबासाहेब कांबळे यांच्या शिफारशीचा ठराव करण्यात आला. (वार्ताहर)