शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

आमणापूर शिवारात हत्यारबंद व्यक्तींचा वावर

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

नागरिकांत दहशतीचे वातावरण : शेतकरी दाम्पत्याला हुसकावून लावले

भिलवडी : आमणापूर (ता. पलूस) येथील कुरण, डुकरी, दरडा, सरळी या शिवारांमध्ये हत्यारबंद व्यक्तींचा वावर असल्याचे काही शेतकऱ्यांच्या निदर्शनास आल्याने, नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी सकाळी दरडा परिसरातील शेतात गेलेले शेतकरी सुभाष अनुगडे व त्यांच्या पत्नीला काही अनोळखी व्यक्तींनी भीती दाखवून हुसकावून लावले. यापूर्वीही अनुगडेवाडी वस्तीवरील शेतकऱ्यांना काही हत्यारबंद व्यक्ती उसाच्या शेतामध्ये संशयास्पदरित्या वावरत असल्याचे निदर्शनास आले आहे. बुधवारी सचिन राडे या शेतकऱ्याचा तीन अज्ञात व्यक्तींनी पाठलाग केला होता. आणखी दोन शेतकऱ्यांनाही तीन अज्ञात व्यक्ती दिसल्या होत्या. आमणापूर परिसरात चोरांचा संशयास्पद वावर वाढला असला तरीही, चोरी किंवा कोणताही अनुचित असा प्रकार घडला नाही. कोणाही नागरिकाला शारीरिक इजाही केलेली नाही. मग हे लोक शिवारात राहून दहशत का निर्माण करतात, हेच लक्षात येत नाही.आमणापूर-येळावी रस्त्यालगत शेतात महिलेचे अवयव व धड सापडल्याने व त्याचे गूढ अद्यापही न उलगडल्याने परिसरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. आमणापुरात एकूण जमिनीच्या ऐंशी टक्के क्षेत्रात उसाचे पीक असल्याने संशयितांना लपून बसण्यास मोठा वाव आहे. आमणापुरातील साठ टक्के महिला शेतमजूर आहेत. महिला वर्गात मोठी दहशत निर्माण झाली आहे. आमणापूर आणि परिसरातील नागरिकांनी स्वसंरक्षणासाठी गस्त सुरू करावी. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता, कोणतीही घटना घडल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधून दक्षता घेणे गरजेचे आहे. (वार्ताहर)भीतीमुळे शेतीची कामे झाली ठप्पचोरांबद्दल एखादी माहिती किंवा अफवा जरी कानावर आली तरी, शेतातील कामे अर्ध्यावर टाकून रोजगारी घरी परतत आहेत. चोरांच्या दहशतीने शेतीकाम करण्यासाठी पुरुष-महिला असे कोणतेच रोजगारी उपलब्ध होईनात. त्यामुळे शेतीमधील कामे बंद आहेत.आमणापूर-येळावी रस्त्यालगत शेतात महिलेचे अवयव व धड सापडल्याने व त्याचे गूढ अद्यापही न उलगडल्याने परिसरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. आमणापुरात एकूण जमिनीच्या क्षेत्रात ऊस पीक जास्त असल्याने संशयितांना लपून बसण्यास मोठा वाव आहे.