शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय पापात ‘स्थायी’ धनी

By admin | Updated: November 22, 2015 00:03 IST

सभेत मंजुरीचा ठराव : घरकुल योजनेच्या निधीचा बेकायदेशीर वापर

सांगली : महापालिकेच्या घरकुल योजनेकडील शासकीय निधीतून दिवाबत्तीच्या ठेकेदाराला सुमारे एक कोटी रुपयांची बिले अदा केल्याच्या प्रकरणाला महापालिकेच्या स्थायी समिती सभेत शनिवारी मंजुरी देण्यात आली. यानिमित्ताने प्रशासकीय पापात आता स्थायी सदस्य धनी बनले आहेत. सभापती संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची शनिवारी सभा पार पडली. या सभेत दिवाबत्ती ठेकेदाराला दिलेल्या एक कोटी रुपयांच्या बिलाची रक्कम इतर लेखाशीर्षात तबदिल करण्याचा विषय अजेंड्यावर घेतला होता. ही रक्कम विद्युत विभागाच्या शिफारशीवरून शासकीय निधीतून देण्यात आली आहे. घरकुल योजनेची रक्कम इतर विभागाच्या बिलासाठी कशी खर्च केली जाऊ शकते, असा प्रश्न उपस्थित झाला. सदस्या निर्मला जगदाळे, शेडजी मोहिते, हारुण शिकलगार यांनी या विषयाच्या बेकायदेशीरपणाचा मुद्दा उपस्थित केला. प्रशासनाला फासावर लटकविण्याइतकी ही गंभीर चूक नाही, असे मत सभापतींनी व्यक्त केले. पुन्हा अशी चूक प्रशासनाकडून होता कामा नये, असे सांगून सभापतींनी हा विषय मंजूर केला. लेखी विरोध कोणीही नोंदविला नाही. त्यामुळे प्रशासनाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. घरकुलच्या नगरअभियंत्यांनी वरिष्ठांकडे टिप्पणी सादर केली आहे. त्यात एक कोटीच्या निधीचा गैरवापर झाल्याचा स्पष्टपणे म्हटले आहे. हा एक कोटीचा निधी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेकडे वर्ग करावा, अशी मागणीही केली आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करून विद्युत अभियंत्याच्या घोटाळ्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत विद्युत अभियंत्याकडूनही खुलासा घेण्यात आला आहे. त्यात त्यांनी देखभाल दुरुस्तीच्या लेखाशीर्षाकडे रक्कम कमी असल्याने व ठेकेदाराचे बिल देणे क्रमप्राप्त असल्याने शासकीय खात्यातून बिल अदा केल्याचे मान्य केले आहे. स्थायी समिती सभेतही अभियंत्यांनी हा प्रकार बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करूनही सदस्यांच्या मंजुरीने त्याला कायदेशीरपणाचा शिक्का बसला आहे. (प्रतिनिधी) आरोग्य अधिकाऱ्यांचा पगार थांबविला... आरोग्य विभागाकडील कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्याबळावरून तसेच असमान कर्मचारी वाटपावरून निर्मला जगदाळे, अश्विनी खंडागळे, आशा शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला. याप्रश्नी अन्य सदस्यांनीही संताप व्यक्त केला. गत सभेत समान कर्मचारीवाटपाचे आदेश देऊनही अधिकाऱ्यांनी असमान वाटप केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे समान वाटप होईपर्यंत आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांचा पगार थांबविण्याचे आदेश यावेळी सभापतींनी दिले. ड्रेनेज योजनेस वर्षाची मुदतवाढ सांगली, मिरजेतील ड्रेनेज योजनेच्या ठप्प असलेल्या कामावरून तसेच प्रलंबित चौकशी अहवालावरून स्थायी समिती सभेत सदस्यांनी संताप व्यक्त केला. अलका पवार, शिवाजी दुर्वे यांनी ड्रेनेजच्या चौकशी अहवालाचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित केला. प्रशासनाने अहवाल प्राप्त झाला नसल्याचे तसेच मुदतवाढ नसल्याने काम ठप्प असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर चर्चेअंती अहवालाच्या अधीन राहून ड्रेनेज ठेकेदाराला १ वर्षे मुदतवाढ देण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. सोमवारपासून सांगली, मिरजेतील बंद असलेल्या ड्रेनेज योजनेचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश सभापतींनी दिले. दिवे बंद होणार... अंदाजपत्रकातील आॅक्टोबरअखेर ६ कोटीच्या तरतुदीपैकी दिवाबत्ती बिलापोटी ३ कोटी ७० लाख रुपये खर्च झाले आहेत. महापालिकेला दरमहा सरासरी ५२ लाख रुपयांचे वीजबिल येते. नोव्हेंबर ते मार्च या पाच महिन्यासाठी वीजबिलापोटी अडीच कोटीची गरज आहे. त्यात शिल्लक रकमेतील एक कोटी रुपये वर्ग झाल्याने या खात्यात एक कोटी ३० लाख रुपये शिल्लक राहतील. त्यामुळे भविष्यात रस्त्यावरील दिवे बंद होण्याची शक्यता आहे.