शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर सुरू झालेला हिंसाचार थांबेना, जमावाने लेलिनचा पुतळा तोडला, भाजपावर आरोप
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
5
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
6
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
7
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
8
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
9
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
10
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
12
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
13
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
14
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
15
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
17
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
18
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श पलूस पंचायत समिती लाचखोरीमुळे झाली कलंकित

By admin | Updated: April 28, 2015 00:20 IST

आदर्शवादाची ‘ऐशीतैशी’ म्हणण्याची वेळ आली आहे. या लाचखोर कर्मचाऱ्यांमुळे सर्व कर्मचाऱ्यांना मान खाली घालण्याची वेळ आली आहे.

पलूस : ‘लाचलुचपत’च्या पथकाने रोजगार हमी योजनेअंतर्गत जनावरांचा गोठा उभारणीसाठी, प्रकरण मंजुरीसाठी ५ हजार रुपयांची लाच घेताना पलूस पंचायत समितीचे कृषी अधिकारी नंदकुमार चव्हाण आणि लिपिक वैजयंता पाटोळे यांना रंगेहात पकडल्याने, आदर्श म्हणून डंका वाजवणाऱ्या पलूस पंचायत समितीला एकप्रकारे कलंक लागला आहे.३४ गावांचा पलूस तालुका हा कृषी, औद्योगिक, सांस्कृतिक, वैचारिक, शैक्षणिक, सामाजिक व राजकीयदृष्ट्या आदर्श आणि प्रगत आहे. सर्व शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यात देशात आणि राज्यात ओळख असणारा पलूस तालुका आहे. निर्मल तालुका, तंटामुक्त तालुका, डिजिटल तालुका, स्वच्छता अभियानात राज्यात उत्तम कामगिरी करणारा तालुका, इको व्हिलेज, शतकोटी वृक्ष लागवड, जलयुक्त शिवार अभियान अशा शासकीय योजनांमध्ये पलूस पंचायत समितीने अत्यंत चांगली कामे केली आहेत. परंतु लाचखोरी प्रकरणामुळे सर्व चांगल्या कामावर ‘विरजण’ पडले आहे. राज्यात आदर्श पंचायत समिती हे नाव आता कलंकित झाले आहे. याबाबत पंचायत समिती आदर्श करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींनी सर्व विभागात जातीने लक्ष घालावे, अशी मागणी येथील जनता करू लागली आहे. पलूस तालुक्यातील भ्रष्टाचाराची ही कीड अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोने वेळीच दूर केली आहे. इथून पुढे भ्रष्टाचाराच्या रोगाला आळा बसेल, अशी आशा नागरिक व्यक्त करीत आहेत. (वार्ताहर)आदर्शवादाची ऐशीतैशी --शेतकरी अगोदरच अस्मानी संकटात सापडला असताना, शासकीय योजनांचा निधी शेतकऱ्यांना देण्यासाठी लाच घेतली जाते, हे उघड झाल्याने पलूस पंचायत समितीतील सर्व विभागात चाललेल्या कामांबाबत शंका निर्माण झाली आहे. आदर्शवादाची ‘ऐशीतैशी’ म्हणण्याची वेळ आली आहे. या लाचखोर कर्मचाऱ्यांमुळे सर्व कर्मचाऱ्यांना मान खाली घालण्याची वेळ आली आहे.