रामपूरच्या शेतमजुराचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:23 IST2021-03-07T04:23:15+5:302021-03-07T04:23:15+5:30

जत : रामपूर, ता. जत येथील शेतमजूर आनंदा महादेव शिवशरण वय ४२ रा. शिवशरण वस्ती, रामपूर यांचा दुचाकी स्लिप ...

Accidental death of a farm laborer in Rampur | रामपूरच्या शेतमजुराचा अपघाती मृत्यू

रामपूरच्या शेतमजुराचा अपघाती मृत्यू

जत : रामपूर, ता. जत येथील शेतमजूर आनंदा महादेव शिवशरण वय ४२ रा. शिवशरण वस्ती, रामपूर यांचा दुचाकी स्लिप होऊन अपघाती मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान शिवशरण वस्ती, रामपूर येथे घडली. याप्रकरणी रात्री उशिरा जत पोलिसात नाेंद घेण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आनंदा शिवशरण यांनी नवीन दुचाकी पंधरा दिवसांपूर्वी खरेदी केली होती. ते मोटारसायकल शिकण्याचा प्रयत्न करत असताना रस्त्यावरील वळणावर त्यांना वेग न आवरता आल्यामुळे मोटारसायकल स्लिप होऊन रस्त्यावर पडल्यामुळे डोक्यास मार जोराचा मार लागला. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांनी हेल्मेट घातले नव्हते. जत औद्योगिक वसाहत येथील वारणा दूध संकलन केंद्रात कर्मचारी म्हणून ते काम करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार एस. ए. कणसे करत आहेत.

Web Title: Accidental death of a farm laborer in Rampur