पन्नास टपाल कार्यालयांमध्ये ‘आधार’चे काम सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:25 IST2021-02-05T07:25:10+5:302021-02-05T07:25:10+5:30

सांगली : जिल्ह्यातील ५० टपाल कार्यालयांमध्ये आधार नोंदणी व दुरुस्ती सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सांगली विभागाचे प्रवर अधीक्षक ...

Aadhaar work started in fifty post offices | पन्नास टपाल कार्यालयांमध्ये ‘आधार’चे काम सुरु

पन्नास टपाल कार्यालयांमध्ये ‘आधार’चे काम सुरु

सांगली : जिल्ह्यातील ५० टपाल कार्यालयांमध्ये आधार नोंदणी व दुरुस्ती सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सांगली विभागाचे प्रवर अधीक्षक ए. आर. खोराटे यांनी याविषयीची माहिती दिली. सांगलीतील मुख्य टपाल कार्यालय, गजानन मिल टपाल कार्यालय, मार्केट यार्ड, विलिंग्डन महाविद्यालय, मिरजेतील मुख्य टपाल कार्यालय, ब्राम्हणपुरी कार्यालय, कुपवाड एमआयडीसी, आरग, आष्टा, आटपाडी, बागणी, ब्राम्हणपुरी (मिरज), शनिवार पेठ कार्यालय, बुधगाव, चिकुर्डे, डफळापूर, देवराष्ट्रे, ढालगाव, दिघंची, जत, कडेगाव, कडेपूर, कामेरी, करगणी, कासेगाव, कवलापूर, कवठेएकंद, कवठेमहांकाळ, शिरढोण, सोनी, तासगाव, उमदी, उरूण इस्लामपूर, खानापूर, खरसुंडी, किर्लोस्करवाडी, कोकरूड, लेंगरे, माधवनगर, माहुली, मणेराजुरी, पलूस, पेठ, रांजणी, सावळज, संख, शिराळा, विटा, वाळवा, येलूर या टपाल कार्यालयांमध्ये ‘आधार’ची नोंदणी व दुरुस्ती सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

Web Title: Aadhaar work started in fifty post offices