शेअर मार्केटमध्ये बुडाले १ कोटी; शेअर ट्रेडरचे केले अपहरण, जयसिंगपूरच्या चौघांसह नऊ जणांवर सांगलीत गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 19:41 IST2025-02-25T19:40:56+5:302025-02-25T19:41:19+5:30

सांगली : शेअर मार्केटमध्ये बुडालेले १ कोटी ६० लाख रुपये दे, नाहीतर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत सांगलीतील ...

A stock trader was kidnapped for money sunk in the stock market Crime against nine people including four from Jaisingpur in Sangli | शेअर मार्केटमध्ये बुडाले १ कोटी; शेअर ट्रेडरचे केले अपहरण, जयसिंगपूरच्या चौघांसह नऊ जणांवर सांगलीत गुन्हा

शेअर मार्केटमध्ये बुडाले १ कोटी; शेअर ट्रेडरचे केले अपहरण, जयसिंगपूरच्या चौघांसह नऊ जणांवर सांगलीत गुन्हा

सांगली : शेअर मार्केटमध्ये बुडालेले १ कोटी ६० लाख रुपये दे, नाहीतर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत सांगलीतील शेअर ट्रेडर्सचा व्यवसाय करणाऱ्या अंजूम जहांगीर लांडगे (वय ४८, ओंकार अपार्टमेंट, लक्ष्मीनारायण कॉलनी, सांगली) यांचे पिस्तुलाच्या धाकाने अपहरण केल्याची फिर्याद त्यांनी नोंदवली आहे. त्यानुसार संशयित फैजल डांगे, रफीक डांगे, मुज्जमिल डांगे, बबलू डांगे (रा. जयसिंगपूर) व सोहेल इनामदार, अलिम पठाण आणि अनोळखी तिघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी अंजुम लांडगे यांचा शेअर्स ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. संशयित सोहेल इनामदार, अलिम पठाण आणि अन्य चौघांनी अंजुम यांना कोल्हापूर रस्त्यावरील ओ-नेस्ट नावाच्या हॉटेलसमोरून दि.२२ रोजी जबरदस्तीने मोटारीत बसवून पिस्तूलचा धाक दाखविला. मोटारीतून जयसिंगपूर येथील डायमंड हॉटेलच्या पाठीमागे असणाऱ्या एका खोलीत आणले. तेथे संशयित फैजल डांगे, रफीक डांगे, मुज्जमिल डांगे, बबलू डांगे यांनी फिर्यादी अंजुम यांना, आमचे बुडालेले १ कोटी ६० लाख रुपये दे, नाहीतर तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणून लाकडी दांडके आणि पिस्तुलाने मारहाण केली. 

फैजल याने २५ लाख रुपयांची मागणी केली. तसेच सोहेल याने अंजुम यांच्या मोबाइलच्या माध्यमातून एक हजार रुपये आणि ३० हजार रुपयांचे यूएसडी कोणत्यातरी अकाउंटवर ट्रान्सफर केले. तसेच प्रत्येक महिन्याला एक लाख रुपये दे, नाहीतर तुला सोडणार नाही अशी धमकी दिली. त्यानंतर संशयितांनी अंजुम यांना सांगलीत सोडून दिले. तसेच त्यांची दुचाकी जबरदस्तीने घेऊन गेले.

या प्रकारानंतर अंजुम यांनी दि.२३ रोजी रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: A stock trader was kidnapped for money sunk in the stock market Crime against nine people including four from Jaisingpur in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.