Sangli News: अज्ञात वाहनाच्या धडकेत कोल्हापुरातील वारकरी महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 18:50 IST2026-03-25T18:49:52+5:302026-03-25T18:50:19+5:30

धडकेनंतर त्या सुमारे २० फूट फरफटत पुढे गेल्या व रस्त्यावर आपटल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला

A female Warkari from Kolhapur died after being struck by an unidentified vehicle at Nagaj on the Ratnagiri Nagpur National Highway | Sangli News: अज्ञात वाहनाच्या धडकेत कोल्हापुरातील वारकरी महिलेचा मृत्यू

Sangli News: अज्ञात वाहनाच्या धडकेत कोल्हापुरातील वारकरी महिलेचा मृत्यू

ढालगाव : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर (नागज फाटा, ता. कवठेमहांकाळ) एका अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत वारकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. मृत महिलेचे नाव लता लक्ष्मण माने (वय ५५, रा. टाकळीवाडी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) असे आहे.

टाकळीवाडी येथील वारकरी दरवर्षीप्रमाणे दिंडीसोबत पंढरपूर येथे विठोबाच्या दर्शनासाठी पायी जात होती. गेल्या १७ वर्षांपासून लता माने या दिंडीत सहभागी होत्या. सोमवारी सायंकाळी दिंडी नागज येथे मुक्कामी थांबली होती. मंगळवारी पहाटेच्या सुमारास दिंडी पंढरपूरच्या दिशेने निघाली असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने लता माने यांना जोरदार धडक दिली. 

धडकेनंतर त्या सुमारे २० फूट फरफटत पुढे गेल्या व रस्त्यावर आपटल्याने गंभीर जखमी झाल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे दिंडीतील वारकऱ्यांमध्ये शोककळा पसरली असून, टाकळीवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृतदेह कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे. घटनेची नोंद करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Web Title : सांगली के पास अज्ञात वाहन की टक्कर से कोल्हापुर की महिला तीर्थयात्री की मौत

Web Summary : सांगली के पास रत्नागिरी-नागपुर राजमार्ग पर एक अज्ञात वाहन की टक्कर से कोल्हापुर की महिला तीर्थयात्री लता माने की मौत हो गई। वह पंढरपुर की पैदल तीर्थयात्रा का हिस्सा थीं। एक अज्ञात वाहन ने उन्हें टक्कर मार दी, जिससे उनकी जान चली गई। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Kolhapur Woman Pilgrim Dies in Hit-and-Run Accident Near Sangli

Web Summary : A Kolhapur woman pilgrim, Lata Mane, died in a hit-and-run accident near Sangli on the Ratnagiri-Nagpur highway. She was part of a walking pilgrimage to Pandharpur. An unidentified vehicle struck her, causing fatal injuries. Police are investigating.