शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

कवठेमहांकाळमध्ये ९८ टक्के मतदान

By admin | Updated: August 9, 2015 00:47 IST

सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक

कवठेमहांकाळ : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कवठेमहांकाळ तालुक्यात शनिवारी अत्यंत चुरशीने आणि शांततेने ९८ टक्के मतदान झाले. सकाळपासूनच मतदारांनी मतदान करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. सकाळी आठ वाजता मतदानाला प्रारंभ झाला. विकास सोसायटी मतदारसंघातील मतदार आणि ग्रामपंचायत मतदारसंघातील मतदारांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली होती. मतदारांनी मतदान केंद्रावर रांगेने उभे राहून मतदान केले. विकास सोसायटी मतदारसंघाचे या तालुक्यात ८३९ इतके मतदान आहे. त्यापैकी ८२४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघात ९८.२१ टक्के मतदान झाले. ग्रामपंचायत गटातही चुरशीचे मतदान झाले. ५४५ पैकी ५२३ मतदारांनी मतदान केले. येथे ९६.१४ टक्के मतदान झाले. तसेच प्रक्रिया गटामध्ये ७१ पैकी ६६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथे ९२.९५ टक्के मतदान झाले. व्यापारी गटातील ३० पैकी ३० मतदारांनी मतदान करून १०० टक्के मतदानाचा हक्क पार पाडला. हमाल व तोलाईदारांनीही १४ पैकी १४ मते दिली. अजितराव घोरपडे, महांकाली साखर कारखान्याचे अध्यक्ष विजय सगरे, सुरेश पाटील, राजवर्धन घोरपडे, गणपती सगरे, चंद्रकांत हाके, वैशाली पाटील, अनिल शिंदे, सुनील माळी, तुकाराम पाटील, तात्यासाहेब नलवडे तसेच दोन्ही पॅनेलचे उमेदवार उपस्थित होते. (वार्ताहर) सामना रंगला गेले आठ ते दहा दिवस तालुक्यात जयंत पाटील, मदन पाटील, संजय पाटील, सुमनताई पाटील, विलासराव जगताप, विजय सगरे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी सहकारी पॅनेलच्या विरोधात डॉ. पतंगराव कदम, अजितराव घोरपडे, विशाल पाटील, विक्रम सावंत, दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखालील वसंतदादा पॅनेल यांच्यात सामना रंगला होता.