शिराळा तालुक्यात ७३ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:34 IST2021-06-09T04:34:02+5:302021-06-09T04:34:02+5:30

शिराळा : तालुक्यात मंगळवारी २५ गावांमध्ये ७३ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. गेल्या पंधरा दिवसांत रविवारी रुग्ण संख्या ...

73 patients in Shirala taluka | शिराळा तालुक्यात ७३ रुग्ण

शिराळा तालुक्यात ७३ रुग्ण

शिराळा : तालुक्यात मंगळवारी २५ गावांमध्ये ७३ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. गेल्या पंधरा दिवसांत रविवारी रुग्ण संख्या घटली. त्यामुळे तालुक्यास दिलासा मिळाला होता. मात्र, मंगळवारी पुन्हा रुग्ण संख्या वाढली आहे. शिराळा, मांगले, सांगाव, गिरजवडे, मणदूर, तडवळे , बिऊर हॉटस्पॉट गावे झाली आहेत.

सांगाव ८, मांगले, शिराळा प्रत्येकी ७, वाकुर्डे बुद्रुक ६, भाटशिरगाव, कोकरूड प्रत्येकी ५, अंत्री बुद्रुक, बिऊर, पवारवाडी प्रत्येकी ४, चिंचोली, कांदे प्रत्येकी ३ यासह २५ गावांत ७३ रुग्ण आढळून आले आहेत. एकूण ९१५ सक्रिय रुग्ण असून गृह विलगीकरण कक्ष ८९३, संस्था विलगीकरण कक्ष १, उपजिल्हा रुग्णालय ४५, कोकरूड ग्रामीण रुग्णालय २०, स्वस्तिक कोविड सेंटर ९ असे रुग्ण उपचार घेत आहेत.

Web Title: 73 patients in Shirala taluka