शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
2
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
3
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
4
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
5
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
6
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
7
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
8
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
9
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
10
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
11
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
12
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
13
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
14
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
15
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
16
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
17
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
18
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
19
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
20
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींविरुद्ध ५६ कर्मचारी न्यायालयात

By admin | Updated: February 23, 2015 23:57 IST

किमान वेतनासाठी लढा : हजारो कर्मचारी वर्षानुवर्षे राबताहेत तुटपुंज्या वेतनावर

सांगली : जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींमध्ये २ हजार २०० कर्मचारी स्वच्छता, पाणी पुरवठ्याची कामे करीत आहेत. यापैकी १ हजार कर्मचारी दीड ते दोन हजार अशा तुटपुंज्या वेतनावर ग्रामपंचायतींमध्ये राबत असून, कोणत्याही रजेचा त्यांना लाभ मिळत नाही. ग्रामपंचायतींकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात जिल्ह्यातील बारा ग्रामपंचायतींमधील ५६ कर्मचाऱ्यांनी न्यायासाठी कामगार कोर्टात धाव घेतली आहे. उर्वरित कर्मचारीही लवकरच न्यायालयात जाणार असल्याचे ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे नेते अ‍ॅड. कुंभार यांनी सांगितले.कामगार कायद्यानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला किमान वेतन ७ हजार १०० रुपये आणि महागाई भत्ता १ हजार ७७५ रुपये असे एकूण आठ हजार ८७५ रुपये मिळाले पाहिजेत. परंतु, जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींपैकी ६० टक्के ग्रामपंचायती कर्मचाऱ्यांना किमान वेतनच देत नाहीत.शासनाचा आदेशच शासनाच्या ताब्यातील स्थानिक स्वराज संस्था पाळत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. ७०४ ग्रामपंचायतींमध्ये सध्या २ हजार २०० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी १ हजार २०० कर्मचाऱ्यांना कागदोपत्री किमान वेतन दिले जात आहे. परंतु, येथील कर्मचाऱ्यांनाही किमान वेतन मिळत नसल्याचे कर्मचारी सांगत आहेत. १ हजार कर्मचाऱ्यांना किमान वेतन लांबच ते दीड ते दोन हजार रुपयांवर पंधरा ते सोळा तास राबत आहेत. या कर्मचाऱ्यांनी किमान वेतनाची मागणी केल्यास त्यांना कामावरून कमी करण्याचा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून दबाव आणला जातो. यामुळे हजारो कर्मचारी न्यायापासून वंचित राहिले आहेत.या कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी ग्रामपंचायत कर्मचारी संघटना सरसावली असून, त्यांनी कामगारांसाठी न्यायालयात धाव घेतली आहे. कडेगाव, कवठेमहांकाळ, आटपाडी, मिरज, पलूस, जत तालुक्यातील ५६ कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायतीकडून किमान वेतन मिळत नसल्याचा दावा कामगार कोर्टात (न्यायालय) दाखल केल्याचे अ‍ॅड. कुंभार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

न्यायालयात गेलेले कर्मचारी

ग्रामपंचायतकर्मचारी
नेर्ले८
खेराडे-वांगी४
ढाणेवाडी४
कडेगाव१६
सासपडे१
येतगाव१
सोनी९
ढोलेवाडी१
कोकळे२
हिवरे१
बिळूर९
एकूण५६


जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी किमान वेतन कायद्यानुसार किमान वेतन मिळावे, यासह अनेक मागण्यांसाठी गुरुवार, दि. २६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चाचे नेतृत्व अ‍ॅड. कुंभार यांनी केले असून, शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास काम बंद आंदोलन छेडण्याचाही कर्मचाऱ्यांनी इशारा दिला आहे.