शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या मुलांना स्वत:विषयी आदर वाटतो?..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 17:43 IST

स्वयंपूर्णतेची ही पहिली पायरी आहे..

ठळक मुद्देमुलांना लायक, सक्षम बनवण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर पालकांनी मदत करायला हवी.छोट्याशा गोष्टीचं खूप मोठं कौतुक नको.मुलांना आपण स्वत:ही आदरानं वागवलं पाहिजे.

- मयूर पठाडेमुलं.. सारीच मुलं खरंतर हुशार असतात. कोणाची हुशारी कोणत्या क्षेत्रात, कोणाची कोणत्या.. एवढाच काय तो फरक.. मात्र प्रत्येक मूल हुशार असतं यात काहीच शंका नाही. पण मुलांमधली हुशारी आपण ओळखतो का, त्यांना तशी संधी देतो का, हादेखील मोठा प्रश्न आहे. मुलांमधली गुणवत्ता ओळखून त्यांना योग्य संधी दिली, तर त्यांचा स्वत:विषयीचा आदरही खूप मोठ्या प्रमाणात वाढेल. मात्र या सर्वात महत्त्वाच्या गोष्टीकडे पालक म्हणून आपलं लक्षच नसतं. एकतर त्याकडे आपण दुर्लक्ष तरी करतो किंवा मुलांना स्वत:विषयी आदर वाटेल असं काही आपण करायचं असतं, हेच अनेक पालकांच्या गावी नसतं.. मात्र या गोष्टीकडे लक्ष दिलं तर मुलं खºया अर्थानं स्वयंपूर्ण होण्याकडे ती वाटचाल असते.मुलांचा स्वत:विषयीचा आदर वाढेल यासाठी काय कराल?१- मुलांना लायक, सक्षम बनवण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर पालकांनी मदत करायला हवी. ही सक्षमताच त्यांच्या मनात स्वत:विषयीचा आदर वाढवेल.२- मुलांना कायम हिडीसफिडीस करणं जसं चूक, तसंच त्यांचे अति लाड करणं आणि त्यांनी मिळवलेल्या यशापेक्षा त्यांचं जास्त कौतुक करणं, त्यांच्या प्रत्येक साध्याशा कृतीलाही त्यानं खूप मोठं अचिव्ह केलं आहे असं भासवणं हेदेखील चूकच.३-मुलांना त्यांच्या वयानुसार आणि त्यांच्या क्षमतेनुसार रिस्क घेऊ द्या. त्याकडे लक्षही ठेवा. कॅलक्युलेटेड रिस्क मुलांमधला आत्मविश्वास वाढवेल.४- मुलांना मदत करणं ठीक, पण प्रत्येकवेळी संकटमोचक म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना आव्हानांपासून वंचित करणंही मुलांच्या वाढीसाठी धोकादायक. संकटांचा सामना केल्याशिवाय आणि त्यातून स्वत: बाहेर पडल्याशिवाय त्यांना त्याचं महत्त्व कळणार तरी कसं?..५- मुलांमधला स्वत:विषयीचा आदर वाढवण्यासाठी आपण स्वतही त्याला आदर दिला पाहिजे.