देशातील कोणत्या शहरातील लोक आपल्या पार्टनरला सगळ्यात जास्त दगा देतात? यादीत आपलं शहर तर नाही ना?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 14:11 IST2026-04-18T14:10:05+5:302026-04-18T14:11:37+5:30
Extra Marital Affairs : या रिपोर्टमध्ये या डेटिंग प्लॅटफॉर्मवर साइन अप आणि अॅक्टिविटी कोणत्या शहरांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये जास्त होते याची यादी तयार करण्यात आलीये.

देशातील कोणत्या शहरातील लोक आपल्या पार्टनरला सगळ्यात जास्त दगा देतात? यादीत आपलं शहर तर नाही ना?
Extra Marital Affairs : शहरांमधील लाइफस्टाईल आणि रिलेशनशिप या दोन गोष्टी नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. शहरांमधील एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सही नेहमी समोर येत असतात. पण अलिकडेच समोर आलेल्या एका डेटिंग अॅपच्या रिपोर्टने तर शहरी लोकांच्या रिलेशनशिपबाबत एक धक्कादायक बाब समोर आणली आहे. या रिपोर्टनुसार, विवाहित लोकांच्या अफेअरच्या घटना केवळ मोठ्या शहरांमध्येच घडतात असं नाही तर छोट्या शहरांमध्येही वाढत आहेत.
२०२५ मधील या रिपोर्टनुसार विवाहित लोकांसाठी असलेलं डेटिंग प्लॅटफॉर्म Ashley Madison च्या यूजर डेटामध्ये भारतातील लोकांचा सहभाग खूप वाढला आहे. या रिपोर्टमध्ये या डेटिंग प्लॅटफॉर्मवर साइन अप आणि अॅक्टिविटी कोणत्या शहरांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये जास्त होते याची यादी तयार करण्यात आलीये. अशात जाणून घेऊया की, देशातील कोणत्या शहरातील लोक आपल्या पार्टनरला सगळ्यात जास्त धोका देतात.
तामिळनाडूतील शहर सगळ्यात पुढे
रिपोर्टनुसार, कांचीपुरम या यादीत सगळ्यात वरच्या नंबरवर आहे. खास बाब ही आहे की, हे शहर आधी १७व्या स्थानावर होतं, पण एक वर्षाआधी थेट पहिल्या नंबरवर आलं आहे. तसं मंदिरे आणि सिल्क साड्यांसाठी लोकप्रिय हे शहर या यादीमुळे चर्चेत आलंय. रिपोर्टमध्ये असंही सांगण्यात आलं की, छोटे शहर आणि गावांमध्येही या प्लॅटफॉर्मचा मोठा वापर होत आहे.
टॉप २० मध्ये दिल्लीतील अनेक भाग
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर सेंट्रल दिल्ली दुसऱ्या नंबरवर आहे. त्याशिवाय दिल्लीतील अनेक भागांचा टॉप २० मध्ये समावेश आहे. साउथ वेस्ट दिल्ली, ईस्ट दिल्ली, साउथ दिल्ली, वेस्ट दिल्ली आणि नॉर्थ वेस्ट दिल्ली. दिल्लीशिवाय एनसीआरमधील शहरं गुरूग्राम, नोएडा आणि गाझियाबादही या यादीत आहेत.
टॉप २० शहरांची यादी
रिपोर्टनुसार भारतात अफेअरसंबंधी ऑनलाईन ट्रेंडच्या आधारावर कांचीपुरम, सेंट्रल दिल्ली, गुरुग्राम, गौतम बुध नगर, साउथ वेस्ट दिल्ली, देहरादून, ईस्ट दिल्ली, पुणे, बंगळुरू, साउथ दिल्ली, चंडीगढ, लखनौ, कोलकाता, वेस्ट दिल्ली, कामरूप, नॉर्थ वेस्ट दिल्ली, रायगढ़, हैदराबाद, गाजियाबाद आणि जयपुर यांचा समावेश आहे. आश्चर्याची बाब म्हणजे मुंबईचा नाव नाही.
का वाढताहेत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर?
तज्ज्ञांच्या मते, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. कामाचे लांब तास, नात्यातील भावनिक दुरावा, वैयक्तिक आयुष्यात वाढलेले स्वातंत्र्य आणि मोठ्या शहरांमध्ये मिळणारी गुप्तता हे घटक या ट्रेंडला चालना देतात. याशिवाय, ऑनलाइन प्लॅटफॉर्ममुळे लोकांना प्रायव्हसीमध्ये नवीन नाती जोडणे पूर्वीपेक्षा खूप सोपे झाले आहे.
एका सर्वेक्षणानुसार, भारत आणि ब्राझीलमध्ये सर्वाधिक लोकांनी त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी अफेअर झाल्याचे मान्य केले आहे. या सर्वेमध्ये सहभागी झालेल्या सुमारे 53 टक्के भारतीयांनी कबूल केले की त्यांचे कधीतरी एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिप झाले आहे.