शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

Valentines day : 'ती नाही म्हणाली' किंवा 'त्याने नकार दिला' तर कसं पचवाल दुःख?... 'या' टिप्स फायदेशीर ठरतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 4:16 PM

आज व्हॅलेंटाईन डे असल्यामुळे अनेक कपल्स फार आनंदात आहेत.

आज व्हॅलेंटाईन डे असल्यामुळे अनेक कपल्स फार आनंदात आहेत. नेहमीच आपल्या पार्टनरसोबत चांगला टाईम स्पेंड करावा असं सगळयांना वाटत असतं. अनेकदा आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांना रिलेशनशिपमध्ये यावस वाटतं. पण नेहमीच  मुलींकडून त्यांना होकार मिळेल असं नाही.  अनेकदा आयुष्यात नकाराचा सामना सुद्धा करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला आवडत्या व्यक्तीकडून नकार मिळाला तर तो कसा पचवायचा हे सांगणार आहोत.

(image credit- semmecards)

ओव्हरपजेसिव्हनेस होऊ नका-

(image credit-devorced moms)

दुसरी व्यक्ती आपल्या प्रेमाला प्रतिसाद देत नसल्यास मनात विचारांचं काहूर माजतं. मेंदूची विशिष्ट रसायनं साथ देत नाहीत. विवेकबुद्धीने विचार होत नाही. आपला अपमान झाला, या विचारानं इगो हर्ट होतो. तिरस्कराची भावना निर्माण होते. संशयी, हिंसक वृत्ती वाढते. तिला प्रेमाची किंमत नाही. या विचारांनी तो बदल्याच्या भावनेत जातो. जोपर्यंत तिला धडा शिकवत नाही तोपर्यंत तो शांत बसत नाही. यातून टोकाचे पाऊल उचलले जाते. चूक समजेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. ओव्हर पझेसिव्हनेसमुळे हे घडतं. समोरच्या व्यक्तीवर माझाच हक्क या वृत्तीमुळे नात्यात कोंडी निर्माण होते.

नकारामागचं कारण लक्षात घ्या- 

(image credit-topyaps)

जर तुम्हाला तुमच्या पार्टनरकडून नकार मिळाला तर she is not my cup of tea असा विचार करून निराश होऊ नका. त्या मुलीचा आधी कोणी बॉयफ्रेंड आहे का? तीला कोणी इतर व्यक्ती आवडते का ? कशाप्रकारे लोक त्या व्यक्तीला आवडतात. तिच्या अपेक्षा काय आहेत. हे लक्षात घ्या.  तुम्ही तिच्या नकाराने स्वतःला कितीही त्रास करून घेतला तरी तो तिच्या पर्यंत पोहोणार नसतो. त्यामुळे स्वतःची मानसिक स्थिती खराब होईल असं वागू नका. तसंच  तिला कोणत्याही गोष्टीसाठी फोर्स करण्याचा प्रयत्न  करू नका. 

(image credit-flickr)

जर तुम्हाला नकार मिळाल्यानंतर तुम्ही त्या मुलीला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर तुमची प्रतिमा तिच्या मनात नकारात्मक होऊ शकते. हे. एकतर्फी प्रेमात समोरच्याकडून होकार मिळत नसेल तर थोडे मागे जाऊन विचार करायला हवा. एका नकाराने जग थांबत नाही. विवेकबुद्धी, थोडे भावनिक प्रयत्न हे प्रेमासाठी योग्य ठरू शकतात. तिने नकार दिला. का दिला? हे जाणून घ्या. ती किंवा तो. अडचण समजून घ्या. प्रत्येकाला स्वत:ची आवडनिवड ठरविण्याचा अधिकार आहे. आपण तो जबरदस्तीने मिळविण्याचा प्रयत्न करू नये.

सकारात्मक विचार असायला हवेत-

(image credit-pinterest)

तिलाही आपण आवडत असू हे गृहीत धरणं फार चुकीचं आहे. एखाद्या मुलीकडून नकार मिळाल्यानंतर सगळयात आधी तुम्हाला तुमचे विचार हे सकारात्मक ठेवायला हवेत. कारण जर तुम्ही नकाराच्या दुखात स्वतःला त्रास करून घ्याल तर कोणतीही गोष्ट करण्यासाठी तुम्हाला फारसा उत्साह येणार नाही. पुन्हा तुमच्या आयुष्यात कोणीतरी येऊ शकतं. त्यामुळे खचून जाऊ नका. ( हे पण वाचा-म्हणून लग्न करताना पार्टनर वयाने मोठा असावा...)

 स्वतःचं परिक्षण करा- 

(image credit-the mordern man)

जर तुम्ही एखाद्या कामात सक्सेस होत नसाल तर नाराज होऊ नका. स्वःपरिक्षण करा. त्यातुन तुमच्यात काय कमी आहे. काय इंप्रुव्ह् करायला हवं. हे आधी लक्षात घ्या. मग त्या दृष्टीने स्वतःवर मेहनत घ्या. खचून जाऊ नका. कारण खचल्यानंतर तुम्ही मानसिकदृष्या खुप कमकुवत होत असता.  आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. ( हे पण वाचा-पुरूषांना 'या' तीन चुका पडू शकतात महागात, गर्लफ्रेंड नेहमीसाठी करेल टाटा-बाय बाय!)

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स