शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

आपल्याच मुलांना ‘नमवण्यात’ काय शौर्य?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 16:57 IST

तुम्ही जर असं काही करीत असाल, तर गमवाल आपल्या मुलांना..

ठळक मुद्देआपल्याच मुलांना नमवण्यात शूरपणा नाही, पराभव आपलाच आहे.मुलांना अद्वातद्वा बोलू नका आणि त्यांना मारू तर अजिबात नका.पालकांविषयी मुलांच्या मनात एकदा का अढी बसली की ती निघणं महामुष्किल.

- मयूर पठाडे‘नाही ना पप्पा.. नाही ना मम्मी. नाही मी पुन्हा असं करणार. तुम्ही सांगाल ते सगळं ऐकेन. रोज अभ्यास करेन. चांगले मार्क्स मिळवीन.. खरंच सांगतो.. चुकलो, सॉरी..’- अनेक घरांमध्ये आई-वडिलांनी मुलांवर रुद्रावतार धारण केल्यावर हे शब्द ऐकायला येतात. दिनवाणा चेहरा करून आणि रडत रडत मुलं आपल्या जमदग्नी आई-वडिलांसमोर विनवणी करीत असतात आणि पालक मुलावर ओरडत असतात, सांग, करशील पुन्हा असं?.. तोंड उचकटून पुन्हा सॉरी म्हणतो’.. पालकांचा तोंडाचा पट्टा सुरूच असतो..जोपर्यंत मुलाला पूर्ण अर्थानं ‘नमवलंय’ याची खात्री होत नाही, तोपर्यंत पालकांचा तोंडाचा आणि बºयाचदा हाताचा पट्टाही सुरूच असतो. सगळेच पालक असेच असतात असं बिलकुल नाही, पण अनेक घरांत आजही ही स्थिती आहे. कुठल्या ना कुठल्या कारणानं आपल्या मुलाला ‘नमवलं’ तरंच त्यांचा हा राग शांत होतो.अभ्यासकांनीही ही वस्तुस्थितीवर नेमकं बोट ठेवलं आहे आणि याबद्दल चिंताही व्यक्त केली आहे. जे पालक आपल्या मुलांबाबत असं करत असतील, त्यांनी वेळीच थांबाव, योग्य तो विचार करावा, आपल्या वर्तनात आधी सुधारणा करावी आणि मुलाबाबतचे आपले संबंध तसेच संवाद मधुर करावा असा कळकळीचा सल्लाही त्यांनी दिला आहे.मुलांच्या वर्तणुकीबद्दल आपण नाराज असतो, त्याबद्दल आपण त्रागा करतो, पण आपल्या वर्तनाची आपण कधी तपासणी केलीय? आणि मुलांना, त्यातही आपल्याच मुलांना ‘नमवण्यात’ कुठलं आलंय शौय?.. तेव्हा हा प्रकार ताबडतोब सोडा आणि आपलीही वागणूक ‘सभ्य’ मुलासारखी ठेवा, असं आवाहन अभ्यासकांनी पालकांना केलं आहे.मुलांना मिळत असणाºया वागणुकीबद्दल भले उघडपणे ते काही बोलणार नाहीत, पण पालकांबद्दलचा त्यांच्या मनातला दुरावा आपोआपच वाढत जाईल. नंतरची त्यांची वर्तणूक अत्यंत चांगली असली, तरी जायचा तो तडा जातोच.. त्यामुळे सावधान..