शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना ‘अभ्यासाचं वळण’ कसं लावायचं म्हणून स्वत:च्या डोक्याची कल्हई करुन घेतलीय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 16:35 IST

नकाच लावू त्याला तसं ‘वळण’..

ठळक मुद्देमुलांना मारुनमुटकून अभ्यासाला बसवलं तर त्याच्या मनातली भीती त्याला काहीच करू देणार नाही.मुलं घाबरलेली असतील तर त्यांचं लक्ष एकाग्र होणार तरी कसं?आपल्या मुलात काही लर्निंग डिसअ‍ॅबिलिटी तर नाही ना, हेही एकदा तपासून घ्या..

- मयूर पठाडेमुलांना वळण लावायचं म्हणजे नेमकं काय करायचं? त्यांच्यापाठी सोटा घेऊन थोडीच पळायचं? मुलांनी आपल्याला दिलेल्या गोष्टी वेळेत पूर्ण केल्याच पाहिजेत, पण त्याच्याकडून त्या का झाल्या नाहीत, हेदेखील आपण तपासायला हवं.अनेक पालक मुलांना ‘अभ्यासाचं वळण’ लावण्यासाठी फार आग्रही असतात. त्याला कायम मारुनमुटकून अभ्यासाला बसवत असतात. रोज इतके तास अभ्यास झाला पाहिजे, म्हणजे झालाच पाहिजे..मूल तासन्तास डोळ्यांसमोर पुस्तक घेऊन तर बसतं, पण खरंच तो अभ्यास करीत असतो? खरं तर अशा धाकदपटशामुळे त्याच्या डोक्यात काहीच शिरत नाही. तो ते मुद्दाम करीत असतो, असंही नाही, पण अशा वातावरणात त्याच्या मनात भीतीच जास्त असते. आणि मनात भीतीचं काहूर माजलेलं असताना मुलाचं लक्ष तरी कसं लागणार? कसं तो मन एकाग्र करणार? त्याच्या हातात एकच गोष्ट असते. आई-बाबांनी सांगितलंय ना, अभ्यास करायचा, रोज इतके तास अभ्यासाचं पुस्तक वाचायचं, मग तो तेवढंच करतो..पुन्हा त्याच्या मनात आणखी भीती असतेच. आता इतके तास वाचल्यानंतर पुन्हा आपल्याला त्यावरचे प्रश्न विचारले जाणार आणि त्याची उत्तरं नाही आली म्हणजे पुन्हा आपली खरडपट्टी निघणार..त्यापेक्षा मुलांना स्वतंत्र सोडा. त्यांचा कल कशात आहे, ते लक्षात घ्या. त्यांची शिकण्याची पद्धत लक्षात घ्या.. म्हणजे काही मुलांना वाचून, काहींना पाहून, तर काहींना ऐकून जास्त कळतं. तशी परिस्थिती, तशी संधी मुलांना उपलब्ध करून द्या..मुलं नक्कीच झपाझप पुढे जातील. त्यासाठी त्यांच्या पाठी लागण्याची आणि जमदग्नीचा अवतार घेण्याची काहीच गरज नाही.आणि हो, आणखी एक.. थोडं काळजीपूर्वक बघा.. आपल्या मुलात काही लर्निंग डिसअ‍ॅबिलिटी तर नाही ना?.. म्हणजे ते अभ्यास करतंय, पण तरीही त्याच्या लक्षात काहीच राहात नाही किंवा त्याला कळत नाही.. अशावेळी त्याच्यात काही गोष्टींबाबत शिकण्याची अक्षमता असू शकते. अर्थातच आपलं मूल तसं आहे म्हणून त्यानं काही बिघडत नाही. ते लक्षात फक्त यायला हवं. डॉक्टरांना किंवा तज्ञांना दाखवून ते तपासून घ्या.. त्याप्रमाणे त्याला मदतीचा हात द्या.. तुम्ही म्हणता तसं ‘वळण’ त्याला आपोआप लागेल..