निसर्गाच्या सानिध्यात जवानांचा योगाभ्यास

By Admin | Updated: June 25, 2016 00:52 IST2016-06-24T23:42:44+5:302016-06-25T00:52:35+5:30

दीड तास : रत्नागिरीतील भारतीय तटरक्षक दलाकडून निवळीत आगळावेगळा उपक्रम

Yoga of Junk in Nature of Nature | निसर्गाच्या सानिध्यात जवानांचा योगाभ्यास

निसर्गाच्या सानिध्यात जवानांचा योगाभ्यास

रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथील धबधबा पात्रात सुमारे दीड तास योगाभ्यास केला. यावर्षीचा दुसरा आंतरराष्ट्रीय योग दिन भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. या जवानांनी या दिवशी सकाळी सात वाजता निवळी येथील धबधब्याच्या पात्रात सुमारे दीड तास योगाभ्यास केला. त्यानंतर तासभर त्यांनी या धबधब्याचा परिसर स्वच्छ केला. यावेळी भारतीय तटरक्षक दलाचे रत्नागिरीचे स्टेशन कमांडर कमांडट एस. एम. सिंग यांनी योगाभ्यासाचे महत्व जवानांना सांगितले. यावेळी त्यांनी योगा व प्राणायाम यांचे महत्त्व विषद केले. परतीच्या प्रवासामध्ये सुमारे पाच किलोमीटर ट्रेकिंग करत या जवानांनी पावसाळ्यातील बहरलेल्या वनराईचा आनंद घेतला.
भारतीय तटरक्षक दलाने आत्तापर्यंत अनेक वेगवेगळे उपक्रम आयोजित केले आहेत. गतवर्षीदेखील येथील तटरक्षक दलाने रत्नागिरी तालुक्यातील एन. सी. सी.च्या विद्यार्थ्यांसमवेत विमानतळ येथे योग दिन साजरा केला होता. यावर्षीही तटरक्षक दलाने निवळी धबधबा येथे परिसराची स्वच्छता करत आगळ्यावेगळ्या पध्दतीने हा दिवस साजरा केला. (प्रतिनिधी)

Web Title: Yoga of Junk in Nature of Nature