शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
'Welcome my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
3
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
4
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
5
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
6
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
7
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
8
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
9
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
10
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
11
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
12
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
13
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
14
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
15
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
16
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
17
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
18
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
19
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
20
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: भर दिवसा ओणी येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 15:21 IST

राजापूर : तालुक्यातील ओझर ते ओणी रस्त्यावर तिवरे गावातील खरब या ठिकाणी दिवसाढवळ्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ओझर येथील अमिना ...

राजापूर : तालुक्यातील ओझर ते ओणी रस्त्यावर तिवरे गावातील खरब या ठिकाणी दिवसाढवळ्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ओझर येथील अमिना मन्सूर मापारी जखमी झाल्या आहेत. गुरुवार, १२ जून रोजी सकाळी ९ वाजता ही घटना घडली.

मन्सूर अकबर मापारी (रा. ओझर), त्यांची पत्नी अमिना आणि मुलगा दुचाकीवरून राजापूरला जात होते. मौजे तिवरे (खरब) येथे रस्त्यात अचानक आलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांची पत्नी अमिना मन्सूर मापारी यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला बिबट्याची नखे लागली. त्यांच्यावर ओणी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.

ही घटना समजताच वनअधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली आणि त्यांचे जबाब नोंदविले आहेत. राजापूरचे वनपाल जयराम बावदाणे, वनरक्षक विक्रम कुंभार, नितेश गुरव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई यांनी केली आहे.