रत्नागिरीत मध्यरात्री अज्ञातांनी जाळल्या दुचाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 12:15 IST2025-06-27T12:13:44+5:302025-06-27T12:15:05+5:30

रत्नागिरी : शहरातील पेठकिल्ला, भाटकरवाडा येथे शुक्रवारी पहाटे अज्ञातांनी तीन गाड्या जाळण्यात आल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. यामध्ये ...

Two wheelers burnt by unidentified persons in Ratnagiri at midnight | रत्नागिरीत मध्यरात्री अज्ञातांनी जाळल्या दुचाकी

रत्नागिरीत मध्यरात्री अज्ञातांनी जाळल्या दुचाकी

रत्नागिरी : शहरातील पेठकिल्ला, भाटकरवाडा येथे शुक्रवारी पहाटे अज्ञातांनी तीन गाड्या जाळण्यात आल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. यामध्ये तिन्ही गाड्या पूर्णतः जळून खाक झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

गुरुवारी मध्यरात्री १२:३० ते शुक्रवारी पहाटे ४:३० वाजण्याच्या दरम्यान या तीन गाड्या जाळण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या गाड्यांना लागलेली आग आटाेक्यात आणण्याचा नागरिकांनी आटाेकाट प्रयत्न केला. मात्र, काही मिनिटातच तिन्ही गाड्या पूर्णतः जळून खाक झाल्या. या घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. 

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा पूर्ण केला. जिल्हा पोलिस अधीक्षक बगाटे यांनी स्वतः घटनास्थळाची पाहणी केली. मात्र, या तीन गाड्या का जाळण्यात आल्या याचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही. गाड्या जाळणाऱ्या आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असे पाेलिस अधीक्षक बगाटे यांनी सांगितले.

Web Title: Two wheelers burnt by unidentified persons in Ratnagiri at midnight