शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अपघातांत दोन ठार, सहा गंभीर

By admin | Updated: May 17, 2015 01:33 IST

पाच दुर्घटना : मृतांमध्ये एक सांगलीचा, तर दुसरा पीरलोटेचा

रत्नागिरी / आवाशी : रत्नागिरी, लांजा आणि खेड तालुक्यांत झालेल्या पाच वेगवेगळ्या अपघातांत दोनजण ठार, तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये विश्वास वसंत गुरव (वय २६, टेंबे, तासगाव, सांगली) आणि अमर अनंत जोईल (२५, पीरलोटे, ता. खेड) या दोघांचा समावेश आहे. रत्नागिरी तालुक्यात शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. विश्वास वसंत गुरव (२६, टेंबे, तासगाव) हा स्कॉर्पिओ (एमएच०९ बीएक्स ९५०९) घेऊन सांगलीहून गणपतीपुळ्याच्या दिशेने निघाला होता. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गाडी गणपतीपुळे मार्गावरील जाकादेवी येथे आली असताना दुसऱ्या वाहनाला बाजू देत असताना गुरव याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात पडली. यात गुरव याचा जागीच मृत्यू झाला. याच गाडीतील सुचिकेत वसंत मोरे (१५) व संदीप माणिक बुचके (२०, दोघेही रा. खानापूर, सांगली) हे गंभीर जखमी झाले. जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर पीरलोटे येथे शुक्रवारी मध्यरात्री १२.३0 वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने पिकअप जीपला धडक दिल्याने पिकअप चालक अमर जोईल जागीच ठार झाला. अमर कामानिमित्त पिकअप जीप घेऊन चिपळूण येथे गेला होता. त्याच्या घरापासून थोड्याच अंतरावर एका अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. त्यात अमरचा जागीच मृत्यू झाला. अन्य एका अपघातात रत्नागिरीहून लांजाच्या दिशेने जाणाऱ्या डंपरसमोर (एमएच ०८ डब्ल्यू ९७९९) गाय आल्याने डंपरचालकाने अचानक गाडीचा वेग कमी केला. त्यावेळी मागून रमेश नेमाराम चौधरी (वय २५, खेर्डी, चिपळूण) हे आपली पत्नी देविका चौधरी (२४) हिच्यासह दुचाकीवरून चिपळूणहून लांजाच्या दिशेने चालले होते. डंपरचा वेग कमी झाल्याने चौधरींनी दुचाकीचा वेग कमी केला. त्याचवेळी भरधाव वेगाने मुंबई ते गोवा जाणाऱ्या इनोव्हा कारची (एमएच ४८ एस ७६५१) दुचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात चौधरी पती-पत्नी दोघेही जखमी झाले. हा अपघात शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास खानू-मठ येथे घडला. लांजा तालुक्यातील आसगे येथे शुक्रवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास एका दुचाकीला अपघात होऊन दोनजण गंभीर जखमी झाले. जखमींची नांवे राजू रमण सरकार (वय ४५, भटवाडी, लांजा) व नीलेश नामदेव लांजेकर (३२, वैभव वसाहत, लांजा) अशी नावे आहेत. गोवा ते दिल्ली असा कोलगेटची वाहतूक करणारा ट्रक (एचआर ५५ के ७११०) रस्त्याच्या बाजूला उलटला. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. हा अपघात शनिवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास कापडगाव (ता. रत्नागिरी) येथे झाला. (शहर वार्ताहर)