शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
5
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
6
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
9
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
10
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
11
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
12
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
13
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
14
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
15
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
16
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
17
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
18
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
19
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
20
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत रेल्वे रुळावर सापडले दोन मृतदेह, एकाची ओळख पटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 17:12 IST

रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरजोळे-एमआयडीसी येथील रेल्वे पूल तसेच आरटीओ ऑफिस समोरील रेल्वे रूळ याठिकाणी मृतदेह सापडले. हा प्रकार मंगळवारी ...

रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरजोळे-एमआयडीसी येथील रेल्वे पूल तसेच आरटीओ ऑफिस समोरील रेल्वे रूळ याठिकाणी मृतदेह सापडले. हा प्रकार मंगळवारी उघडकीला आली. यातील आरटीओ कार्यालयासमोरील रेल्वे रुळावर सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून, त्याचे नाव दत्ता बिरा यमगर (३४, मूळ रा. सांगोला, सोलापूर, सध्या रा. कुवारबाव, रत्नागिरी) असे आहे.मंगळवारी रात्री रेल्वे पोलिसांना मिरजोळे एमआयडीसी येथील रेल्वे पुलाजवळ तसेच आरटीओ कार्यालयाच्या समोरील रेल्वे रुळावर तरुणांचे मृतदेह दिसले. एमआयडीसी रेल्वे पुलाजवळ सापडलेल्या मृतदेहाच्या शरीरावरून रेल्वे गेल्याने त्याचे शीर धडापासून वेगळे झाले होते. याबाबत रेल्वे पोलिसांनी ग्रामीण पोलिसांना माहिती दिली.तसेच आरटीओ येथील रेल्वे रुळावर सापडलेल्या मृतदेहाची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. दोन्ही पोलिस स्थानकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहांचे पंचनामे करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले. या तरुणांनी रेल्वे खाली आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याबाबत ग्रामीण व शहर पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास ग्रामीणचे पोलिस उपनिरीक्षक कदम आणि शहर पोलिस स्थानकाचे हेेडकाॅन्स्टेबल गायकवाड करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीrailwayरेल्वेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस