वळणे वसाहतीचे पुनरूज्जीवन?

By Admin | Updated: August 30, 2015 00:33 IST2015-08-30T00:30:33+5:302015-08-30T00:33:42+5:30

संजय कदम : उद्योग सुरु न केल्याने वसाहतीतील जागा मोकळ्या

Turning colonial revival? | वळणे वसाहतीचे पुनरूज्जीवन?

वळणे वसाहतीचे पुनरूज्जीवन?

दापोली : दापोली वळणे औद्योगिक वसाहतीतील प्लॉटधारकांनी उद्योग सुरु न केल्याने वसाहतीतील जागा उद्योगाविनाच पडून आहेत. काही मोजके उद्योग मात्र सुरु आहेत. औद्योगिक वसाहतीत जास्तीतजास्त उद्योग सुरु होऊन बेकारांना रोजगार मिळावा या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले असून, वळणे येथील आजारी औद्योगिक वसाहतीला ऊर्जितावस्था मिळवून देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे आमदार संजय कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
वळणे औद्योगिक वसाहतीला ऊर्जितावस्था मिळावी, वसाहतीतील उद्योजकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात. ज्या उद्योजकांनी केवळ जागा अडवून ठेवण्याचे काम केले आहे, त्यांच्या जागा परत घेऊन इतर उद्योजकांना द्याव्यात या मुख्य उद्देशानी दापोलीचे आमदार कदम यांनी उद्योजक व अधिकारी यांची बैठक बोलावली होती. औद्योगिक वसाहतीचे प्रादेशिक अधिका२ी प्रकाश पाटील, बी. एस. राठोड, एस. डी. तावडे या अधिकाऱ्यांनी वळणे औद्योगिक वसाहतीची पाहणी करुन घटनास्थळाची माहिती घेतली.
दापोली-वळणे औद्योगिक वसाहतीसाठी ४० एकर जागा आहे. या ४० एकर जागेपैकी केवळ १० एकर जागेवरच उद्योग सुरु आहेत. ज्या लोकांनी केवळ जागा अडवून ठेवल्या आहेत त्यांच्या जागा परत घेऊन स्थानिक उद्योजकांना देण्यात याव्यात अशी सूचना आ. कदम यांनी अधिकाऱ्यांना दिली. या वसाहतीमध्ये १० एकरचा प्लॉट एका व्यक्तीने गेली १५ वर्ष अडवून ठेवला आहे. हा प्लॉट काढून घेऊन उद्योजकांना द्यावा अशी सूचना आ. कदम यांनी केल्यानंतर प्रादेशिक अधिकारी पाटील यांनी एक महिन्यात या वसाहतीला चांगले दिवस येतील असे सांगितले. वसाहत पाहणी दौऱ्यात दिलेले वचन पाळण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Turning colonial revival?