शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

वरवडेजवळील रस्ता खचल्याने वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:25 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील रेवस रेडी सागरी महामार्गावरील वरवडेजवळील उंडीचा पऱ्या येथील मोरीवरील रस्ता खचला असून, ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील रेवस रेडी सागरी महामार्गावरील वरवडेजवळील उंडीचा पऱ्या येथील मोरीवरील रस्ता खचला असून, गुरुवारी दुपारपासून वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. याबाबतची माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग यांना देण्यात आली. याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अमृत पडवळ व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल होऊन जेसीबीच्या साह्याने खचलेला रस्ता तात्पुरता जांभा चिरा तसेच खडी टाकून बुजवण्यात आला.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला ग्रामपंचायत वरवडे सरपंच विराज पारकर व सदस्य, तसेच मालगुंड गावचे सरपंच दीपक दुर्गवळी, उपसरपंच विपुल साळवी व सदस्य तसेच महसूल विभागाचे कर्मचारी मंदार यादव व सुशील दुर्गवळी उपस्थित होते. सध्या या रस्त्यावर तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली असून, उर्वरित डागडुजी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.

या सागरी महामार्ग गणपतीपुळे-मालगुंड-वरवडे-जयगड-खंडाळा आदी महत्त्वाच्या गावांकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरून दररोज प्रवास करणारे पर्यटक ग्रामस्थ तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, रुग्ण प्रवास करतात. हा प्रकार लवकर लक्षात आल्याने जीवितहानी अथवा अपघात टळला.

याठिकाणी गणपतीपुळे पोलीस चौकीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अस्मिता पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सागर गिरीगोसावी यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या रस्त्यावरील खचलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने बावटे लावण्यात आले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूने धिम्या गतीने वाहतूक सुरू आहे.