Ratnagiri: पतीचे विवाहबाह्य प्रेमसंबंध, कौटुंबिक जाच; कंटाळून विवाहितेने संपविले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 14:00 IST2025-06-28T13:59:47+5:302025-06-28T14:00:20+5:30

पतीसह सासूवर गुन्हा दाखल

Tired of her husband's extramarital affair and family oppression, a married woman ended her life in Chiplun | Ratnagiri: पतीचे विवाहबाह्य प्रेमसंबंध, कौटुंबिक जाच; कंटाळून विवाहितेने संपविले जीवन

Ratnagiri: पतीचे विवाहबाह्य प्रेमसंबंध, कौटुंबिक जाच; कंटाळून विवाहितेने संपविले जीवन

चिपळूण : पतीचे विवाहबाह्य प्रेमसंबंध, त्यातून होणारी मारझोड आणि सासूकडून होणारा मानसिक व शारीरिक छळ अशा कौटुंबिक जाचाला कंटाळून खांदाट-मोरवणे फाटा येथील विवाहितेने आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीला आला आहे.

शकुंतला अशोक चव्हाण (वय २७, रा. खांदाट, मोरवणे फाटा, चिपळूण) असे तिचे नाव आहे. याबाबत तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती अशोक मोतीराम चव्हाण व सासू कमलाबाई मोतीराम चव्हाण यांच्यावर चिपळूण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची फिर्याद विनायक जयसिंग राठोड (५५, मूळ रा. जानवळ, ता. चाकूर, जि. लातूर) यांनी दिली आहे. तालुक्यातील खांदाट-मोरवणे फाटा येथील आपल्या राहत्या घरी शकुंतला चव्हाण हिने बुधवारी सकाळी ११:३० ते दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली हाेती. मात्र, ही आत्महत्या आपल्या मुलीने कौटुंबिक जाचाला कंटाळून केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शकुंतला हिचा पती अशोक चव्हाण याचे कामातील एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. यातून घरामध्ये वारंवार वाद होत होते. यादरम्यान अशोक हा शकुंतला हिला मारहाण करत होता. तसेच सासू कमलाबाई चव्हाण याही शिवीगाळ, दमदाटी करत हाेत्या. तसेच ‘तू घरातून निघून जा, मला तुझी गरज नाही,’ असे बोलून तिला वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देत हाेत्या.

या छळाला कंटाळून शकुंतला हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तिच्या वडिलांनी फिर्याद म्हटले आहे. त्यानुसार चिपळूण पोलिसांनी पती व सासू यांच्यावर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १०८, ८५, ३(५) नुसार २६ जून राेजी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Tired of her husband's extramarital affair and family oppression, a married woman ended her life in Chiplun