Ratnagiri Crime News: सोशल मीडियावर ओळख झाली, महिलेने व्यावसायिकाला घातला ३६ लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 14:11 IST2026-02-04T14:09:02+5:302026-02-04T14:11:35+5:30

फिर्यादीला यूएसडीटी ट्रेडिंग करून कमी वेळात जास्त नफ्याचे आमिष दाखवले

Through an acquaintance made on social media a woman defrauded a businessman from Ratnagiri of 36 lakhs by luring him with the promise of high profits in cryptocurrency | Ratnagiri Crime News: सोशल मीडियावर ओळख झाली, महिलेने व्यावसायिकाला घातला ३६ लाखांचा गंडा

Ratnagiri Crime News: सोशल मीडियावर ओळख झाली, महिलेने व्यावसायिकाला घातला ३६ लाखांचा गंडा

रत्नागिरी : सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून महिलेने क्रिप्टो करन्सीमध्ये जादा नफ्याचे आमिष दाखवत एका व्यावसायिकाला तब्बल ३६ लाख ६४ हजार ७४० रुपयांचा ऑनलाइन गंडा घातला. हा प्रकार ४ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसी येथील फिर्यादीच्या गांधी फॅब्रिकेटर्स या दुकानात घडला आहे.

याप्रकरणी सुहानी शर्मा आणि डॅनियल (पूर्ण नाव, गाव माहीत नाही) या दोघांविरोधात रत्नागिरी सायबर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, त्याची सोशल मीडियावर सुहानी शर्मा या महिलेशी ओळख झाली होती. महिलेने फिर्यादीचा विश्वास संपादन करून तिचा मित्र डॅनियल हा क्रिप्टो करन्सी मार्केटच्या (ट्रस्टीन कॉईन) या वेब ॲप्लिकेशनचा सीनियर अकाउंट मॅनेजर असल्याचे फिर्यादीला भासवले.

त्यानंतर फिर्यादीला यूएसडीटी ट्रेडिंग करून कमी वेळात जास्त नफ्याचे आमिष दाखवले. महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवत तिचा मित्र डॅनियलद्वारे एक लिंक पाठविण्यात आली. फिर्यादीने ही लिंक ओपन करून (ट्रस्टीन कॉईन) या वेब ॲप्लिकेशनमध्ये लॉगिन केले.

त्यानंतर फिर्यादीची वेळोवेळी दिशाभूल करून संशयितांनी फिर्यादीला पैसे गुंतवण्यास भाग पाडले. फिर्यादीने वेळोवेळी एकूण ३६ लाख ६४ हजार ७४० रुपये संशयितांच्या सांगण्यावरून गुंतवले. परंतु, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने सोमवारी (दि. २) रत्नागिरी सायबर पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title : रत्नागिरी: महिला ने व्यवसायी को क्रिप्टो घोटाले में ₹36 लाख का चूना लगाया।

Web Summary : रत्नागिरी में एक व्यवसायी को क्रिप्टोकरेंसी घोटाले में एक महिला और उसके साथी ने ₹36.64 लाख का नुकसान पहुंचाया। पीड़ित को एक नकली वेब एप्लिकेशन के माध्यम से उच्च रिटर्न का वादा किया गया था। पुलिस ने आरोपियों के खिलाफ मामला दर्ज किया है।

Web Title : Ratnagiri: Woman swindles businessman of ₹36 lakhs in crypto scam.

Web Summary : A Ratnagiri businessman lost ₹36.64 lakhs to a woman and her accomplice in a cryptocurrency scam. The victim was lured with promises of high returns via a fake web application. Police have registered a case against the accused.