शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दुकाने उघडी ठेवल्याने तीन व्यापाऱ्यांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:34 IST

चिपळूण : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकारी यांनी कडक निर्बंध लागू केलेले असतानाही गुरुवारी येथील बाजारपेठेत काही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने ...

चिपळूण : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकारी यांनी कडक निर्बंध लागू केलेले असतानाही गुरुवारी येथील बाजारपेठेत काही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सुरू ठेवली होती. या पार्श्‍वभूमीवर नगर परिषदेच्या पथकाने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला. यामध्ये बाजारपेठेतील नाथ पै चौकातील ३ बड्या व्यापाऱ्यांकडून प्रत्येकी १ हजाराचा दंड करीत दुकान बंद करण्यास भाग पाडले. तसेच घरपोच सेवा देण्याविषयी समज दिली.

जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी बुधवारी जाहीर केलेल्या नवीन आदेशानुसार ५ हजारपेक्षा अधिक लोकवस्ती असलेल्या ठिकाणी कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार चिपळूण शहर, खेर्डी व सावर्डे येथील व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवून घरपोच सेवा देण्याची सूचना केली होती. तरीही गुरुवारी काही व्यापाऱ्यांनी दुकाने सकाळच्या सत्रात सुरू ठेवली होती. बाजारपेठेतील नाथ पै चौक येथील किराणा माल, कापड व बेकरीचे दुकान उघडे दिसून आले. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यानंतर दिवसभर नगरपरिषदेच्या पथकामार्फत शहरात सर्वत्र लक्ष ठेवण्यात आले होते. दरम्यान, शहरातील बहादूरशेखनाका, वांगडे मोहल्ला, प्रांत कार्यालय, चिंचनाका, शासकीय विश्रामगृह येथे मोबाईल व्हॅनद्वारे काही नागरिकांची अ‍ॅन्टिजेन तपासणी करण्यात आली. यामध्ये ५ जण कोरोनाबाधित आढळले. तसेच पवन तलाव येथील तपासणी केंद्रावर २२ जणांची आरटीपीसीआर व २१ जणांची अ‍ॅन्टिजेन तपासणी करण्यात आली. यामध्ये ५ जण कोरोनाबाधित आढळले.

........................................

कोरोनाबाधित रुग्णांचे होताहेत हाल

सध्या तालुक्यात १३०० हून अधिक कोरोनाबाधित रुग्णसंख्या पोहोचली असून, त्याचा ताण येथील आरोग्य यंत्रणेवर येऊ लागला आहे. कामथे उपजिल्हा रुग्णालयासह खासगी रुलये हाऊस फुल्ल झाली आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुना वेळीच उपचार मिळणे कठीण बनले आहे. काही रुग्णांना बेड मिळवण्यासाठी प्रत्येक रूग्णालयात फिरावे लागत आहे. त्यासाठी नेेते, पुढाऱ्यांना विनवणी करण्याची वेळ काही रुग्णांवर येऊ लागली आहे.