शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कुंडीत घर आगीत जळून पावणेतीन लाखांची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 13:16 IST

शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत कुंडी येथील बंद घर जळाल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. यामध्ये प्रकाश कृष्णा सावंत यांचे सुमारे २ लाख ७५ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाले आहे. कुंडीतील ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आणि मदतीमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

ठळक मुद्देकुंडीत घर आगीत जळून पावणेतीन लाखांची हानीरात्रीचा पाणीपुरवठा

देवरुख : शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत कुंडी येथील बंद घर जळाल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. यामध्ये प्रकाश कृष्णा सावंत यांचे सुमारे २ लाख ७५ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाले आहे. कुंडीतील ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आणि मदतीमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.संगमेश्वर तालुक्यातील कुंडी - पाटीलवाडी येथील प्रकाश सावंत हे नोकरी निमित्ताने मुंबई येथे असतात. त्यांचे मूळ घर गावात आहे. सोमवारी रात्री ११.३०च्या सुमारास शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत सावंत यांच्या घराच्या तीन खोल्या पूर्ण जळाल्या आहेत.

आगीचे लोळदेखील दिसू लागल्यानंतर बौध्दवाडीतील विलास कांबळे व अनंत कांबळे यांनी ग्रामस्थांना ही माहिती दिली. असंख्य लोक लगेचच घटनास्थळाकडे जमले आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला.देवरूख पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पंचनामा तलाठी बालाजी साळी, सरपंच आकांक्षा सावंत, उपसरपंच दिलीप लोकम, ग्रामसेविका प्रभावती भोसले, पोलीसपाटील धीरेंद्र मांजरेकर यांनी केला. माजी सरपंच संगीता सावंत, शिवराम देसाई यांनी मोठी मदत केली.रात्रीचा पाणीपुरवठारात्री उशिरा ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा सुरु केला म्हणूनच पाण्याचा मारा करुन ग्रामस्थांना आग आटोक्यात आणता आली. अन्यथा संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असते. रात्री २.३० वाजेपर्यंत हे शर्थीचे प्रयत्न चालू होते.

टॅग्स :fireआगRatnagiriरत्नागिरी