शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

खेडमध्ये निधी नाही; विकास खुंटला

By admin | Updated: July 10, 2015 22:23 IST

पर्यावरण समृद्धी : ४९ ग्रामपंचायती पात्र

खेड : तालुक्यातील ११४पैकीकेवळ ४९ ग्रामपंचायती शासनाच्या पर्यावरण संतुलित ग्रामसमृध्दी योजनेअंतर्गत पात्र ठरल्या आहेत, तर ६५ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव अद्याप रखडले आहेत. निधीअभावी ही स्थिती उद्भवली असल्याचे सांगण्यात येत आहे़पर्यावरण संतुलित ग्रामसमृध्दी योजनेअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या विविध विकासकामांच्या योजनेतूनच ग्रामपंचायतीअंतर्गत विकास करण्याची शासनाची संकल्पना आहे. अशा कामांच्या माध्यमातून गावाचा विकास साधायचा आहे. पंचायत राज व्यवस्थेतील अखेरचा टप्पा असलेल्या ग्रामीण भागाचा विकास करण्याकडे सध्या राज्य सरकारने आपले लक्ष केंद्रीत केले आहे. दोन्ही सरकारने आता गावाचा विकास साधण्याच्या अनेक योजना मूर्त स्वरूपात आणल्याने ग्रामपंचायतींना विशेष अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. गावातील अनेक ठिकाणी पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. याकरिता पोषक वातावरण निर्माण व्हावे, यातूनच ग्रामीण भागाचा विकास होऊन पर्यावरण संतुलन राखणे सोपे व्हावे, या उद्देशाने ही योजना प्रभाविपणे राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.या योजनेअंतर्गत खेड तालुक्यातील ११४ ग्रामपंचायती पात्र ठरल्या होत्या. यावरून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. याच धर्तीवर आता यावर्षी तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव २४ नोव्हेंबर २०१४ रोजी पंचायत समितीमार्फत पाठविण्यात आले होते. मात्र, त्यास अद्याप मंजुरी मिळाली नाही. तिसऱ्या टप्प्यात ४९ ग्रामपंचायती अनुदानासाठी पात्र ठरल्या. मात्र, निधीअभावी त्यांचे हे प्रस्ताव सध्या रखडलेले आहेत. अशा रखडलेल्या प्रस्तावांचे काय करायचे, याबाबत आता वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून, निधीअभावी ही कामे रोखली जाऊ नयेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. खेड तालुक्यातील केवळ ४९ ग्रामपंचायती या योजनेसाठी पात्र ठराव्यात, हे चित्र शोभादायक नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)