Ratnagiri: चोरटा साडेचार तास बँकेत थांबला; पण पैसा हाती नाही लागला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 18:40 IST2025-07-16T18:39:50+5:302025-07-16T18:40:23+5:30

लॅपटॉप, सुटकेस, स्कॅनरसह किरकोळ साहित्य चोरले

Theft at Bank of India branch in Lote Parshuram Industrial Estate in Khed taluka ratnagiri | Ratnagiri: चोरटा साडेचार तास बँकेत थांबला; पण पैसा हाती नाही लागला

Ratnagiri: चोरटा साडेचार तास बँकेत थांबला; पण पैसा हाती नाही लागला

आवाशी : खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील सातत्याने गजबजलेल्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेत एक चोरटा तब्बल साडेचार तास थांबला. मात्र, काहीच पैसे हाती न लागल्याने अखेर लॅपटॉप, रोख रकमेची ने-आण करण्यासाठी वापरली जाणारी सुटकेस, स्कॅनर आणि अन्य काही किरकोळ साहित्य चोरण्यावरच त्याला समाधान मानावे लागले. ही घटना रविवारी सायंकाळच्या दरम्यान घडली असून यामुळे लोटे परिसरात खळबळ उडाली आहे.

लोटे परशुराम वसाहतीत मुंबई- गोवा महामार्गालगत असणाऱ्या बँक ऑफ इंडिया ही शाखा मागील पन्नास वर्षांपासून कार्यरत आहे. शनिवार, दि. १२ व रविवार, दि. १३ रोजी बँकेला सुटी होती. याचा फायदा घेऊन चोरट्याने रविवारी सायंकाळी साडेचार वाजता बँकेच्या मागील बाजूने खिडकीची लोखंडी जाळी तोडून आत प्रवेश केला. बरेच प्रयत्न करूनही रोख रक्कम वा दागिने त्याच्या हाती लागले नाहीत. ते मिळविण्यासाठी तो साडेचार तास बँकेत वावरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.

अखेर काहीच किमती वस्तू हाताला लागत नसल्याने त्याने बँकेतील एक लॅपटॉप, रोख रकमेसाठी वापरण्यात येणारी सुटकेस, एक स्कॅनर व अन्य साहित्य चोरून नेले. ही बाब सोमवारी सकाळी बँकेत आलेल्या कर्मचारी व शिपायांच्या लक्षात येताच लोटे पोलिस दूरक्षेत्रात तक्रार देण्यात आली आहे. लोटे पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे.

Web Title: Theft at Bank of India branch in Lote Parshuram Industrial Estate in Khed taluka ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.