शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
7
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
8
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
9
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
10
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
11
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
12
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
13
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
14
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
15
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
16
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
17
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
18
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
19
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
20
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी

Ratnagiri: महामार्ग चौपदरीकरणातील चुकांमुळे अपघात वाढले, खेड तालुक्यात नवे ब्लॅक स्पॉट तयार झाले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 18:13 IST

उपाययोजनाच नाहीत

खेड : मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण होताना अवघड आणि धोकादायक वळणे काढून टाकली जाणे अपेक्षित होते. मात्र ती तशीच राहून आणखीही काही नवे ब्लॅक स्पॉट तयार झाले आहेत. दुर्दैवाने यामध्ये खेड तालुक्यातील भाेस्ते घाट आणि जगबुडी नदीवरील पूल अशा दोन ठिकाणांचा समावेश आहे. भोस्ते घाटात गेल्या वर्ष / दीड वर्षात १०० हून अधिक अपघात झाले आहेत तर जगबुडी नदीवरून पुलावर आतापर्यंत सातपेक्षा अधिक मोठे अपघात झाले आहेत.खवटी ते धामणदेवी या सुमारे ४४ कि.मी.च्या चौपदरीकरणात अनेक ठिकाणी महामार्गाचे निकष न पाळताच केवळ रुंदीकरण करण्यात आले आहे. या ४४ कि.मी. च्या टप्प्यात केवळ ३ उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. यातील एक पूल भरणे नाका येथे असून या पुलाचे टोक या जगबुडी पुलावर येऊन मिळते याच ठिकाणी उड्डाणपुलाचा सर्व्हिस रोडही येऊन मिळतो.या अरुंद भागात वळण असल्यामुळे मुंबईकडून उड्डाण पुलावरून वेगाने येणारी वाहने अनियंत्रित होऊन सातत्याने अपघात घडत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. यापूर्वी टँकर, ट्रक ट्रेलर यासारख्या अवजड वाहनांचे अपघात झाले आहेत. एका अपघातात ट्रक चालक समोरील काचेतून नदीत पडला होता. पुलाच्या उजव्या बाजूला असलेली संरक्षक भिंत तुटली असून, त्यामुळेच सोमवारी पहाटे कार थेट नदीपात्रात कोसळली असल्याचे अनेकांनी बोलून दाखवले.

उपाययोजनाच नाहीत

  • महामार्गाचा आराखडा तयार करताना यामध्ये गंभीर दोष असल्याचे भोस्ते घाटातही सिद्ध झाले आहे.
  • तीव्र उतार व वळण असलेल्या ठिकाणी गेल्या काही वर्षांच्या कालावधीत शेकडो किरकोळ व गंभीर अपघात झाले आहे.
  • या वळणावर मोठे कंटेनर व ट्रेलर, ट्रक, खासगी आरामबसचे अपघात वारंवार झाले आहेत.
  • मात्र या गंभीर विषयावर ठेकेदार कंपनी किंवा महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंते यापैकी कोणीही ठोस उपाययोजना करण्याच्या विचारातच नाहीत.

दोन पूल एकत्र येतात तेथे..

  • महामार्ग चौपदरीकरणाच्या आराखड्यात हे दोन्ही नवीन पूल बांधताना वाहनांचा वेग लक्षात घेऊन त्या पुलांचे जोडरस्ते शास्त्रीय परिमाणात बांधणे आवश्यक होते. मात्र याकडे त्यावेळी पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
  • मात्र किमान याठिकाणी सातत्याने होत असलेले अपघात लक्षात घेऊन महामार्ग बांधकाम विभागाने ठेकेदार कंपनीला अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करून घेण्यात भाग पाडणे गरजेचे होते. त्याकडे लक्ष न दिल्याने आतापर्यंत अनेक अपघात झालेत आणि बळीही गेले आहेत.

१०० हून अधिक अपघात भोस्ते घाटात गेल्या वर्ष / दीड वर्षात झाले आहेत तर जगबुडी नदीवरून पुलावर आतापर्यंत सातपेक्षा अधिक मोठे अपघात झाले आहेत

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्गAccidentअपघातDeathमृत्यू