शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
5
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
6
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
7
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
8
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
9
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
10
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
11
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
12
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
13
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
14
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
15
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
16
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
17
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
18
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
19
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
20
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 19:39 IST

Bhaskar Jadhav News: तेव्हा मला मंत्रिपद का दिले नाही याचे उत्तर कोणाकडे असेल तर त्यांनी द्यावे. मंत्रिपद मिळाले नाही म्हणून काय रडत बसायचा का, उलट लढायचे, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.

Bhaskar Jadhav News: विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर आता ठाकरे गटाला पडत असलेले खिंडार दिवसेंदिवस अधिकच मोठे होताना पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटानंतर आता भाजपामध्ये माजी नगरसेवक, पदाधिकारी, नेते प्रवेश करताना दिसत आहेत. तर ठाकरे गटातील काही विद्यमान आमदारांना शिवसेना शिंदे गटाकडून खुली ऑफर दिली जात असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. शिवसेना शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंग असते. अशातच ठाकरे गटाचे कोकणातील आमदार भास्कर जाधव यांनी निवृत्तीची भाषा केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्याचे म्हटले जात आहे. 

पत्रकारांशी बोलताना भास्कर जाधव यांनी आपली खदखद व्यक्त केली. तसेच मंत्रिपद न मिळाल्याबाबतही खंत व्यक्त केली. मला शिवसेना पक्षात भाषणे करायची संधी मिळते, तसेच पक्षाच्या हितासाठी मी जे करायचे ते करतो. पण, मी कुणाची हुजरेगिरी कर नाहीत, हा ला हा किंवा ना ला ना... असे म्हणणारा कार्यकर्ता आहे. शिवसेनेचा शाखाप्रमुखच हाच शिवसेनेचा कणा होता, पण कुठेतरी शिवसेनेत शाखाप्रमुखच बाजूला होत असल्याचे मला दिसले, म्हणून त्याच अनुषंगाने शिवेसना पक्षाच्यावतीने शिबिराचे आयोजन केले होते, असे भास्कर जाधव यांनी सांगितले.

३९ जागांपैकी एकटा निवडून आलोय, ८ वेळा निवडणुका जिंकल्यात

कार्यकर्ते कमी होत आहे, म्हणून निवृत्ती घ्यायचे काहीच कारण नाही. ३९ जागांपैकी मी एकटा निवडून आलो आहे. शेवटी आठ-आठ वेळा वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर असे वाटते की, आता थांबायचा विचार करावा, यापेक्षा वेगळे कारण नाही, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. तसेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना, आपल्याला मंत्रि‍पदाची संधी मिळाली नाही. मला मंत्रिपद का दिले नाही याचे उत्तर कोणाकडे असेल तर त्यांनी द्यावे. माझ्यावर झालेला अन्याय उघडपणे सांगितला, यापुढेही सांगेन, असे भास्कर जाधव यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, मला मंत्रिपद मिळायला पाहिजे होते, मी तेव्हा बोललो. मी आजही बोलेन. उद्याही बोलेन. मला मंत्रिपद का मिळायला नको, हे मला कोणी सांगायला हवे. मला मंत्रिपद मिळाले नाही म्हणून काय रडत बसायचा का? उलट लढायचे. मला मंत्रिपद मिळाले नाही, म्हणून जे फुटून गेले त्यांच्याबरोबरही मी गेलो नाही. मी लढत आहे, असे भास्कर जाधव यांनी नमूद केले.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBhaskar Jadhavभास्कर जाधवPoliticsराजकारण