शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात १६ गावांवर दरडीची टांंगती तलवार

By admin | Updated: June 6, 2014 00:14 IST

प्रशासन विशेष लक्ष ठेवणार

रत्नागिरी : गेल्या काही वर्षात अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याच्या तसेच दरडी कोसळणाच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात वित्त हानी होत असल्याने यावर्षी अशा गावांवर प्रशासन विशेष लक्ष ठेवणार आहे. जिल्ह्यात अशी १६ गावे असून, त्यात सर्वाधिक गावे दापोली तालुक्यात आहेत.पावसाळा जवळ आला असल्याने जिल्ह्यात उद्भवणार्‍या संभाव्य आपत्तींचा विचार करून जिल्हा प्रशासनाकडून सर्व ती तयारी पूर्ण करण्यात आली आहे. गेल्या महिन्यामध्ये सर्व विभागप्रमुखांची बैठका घेऊन त्यांना सूचना देण्यात आली आहे. यावेळी आपत्कालीन सर्व प्रकारच्या आपत्तींचा कसा सामना करावा, याची सविस्तर माहिती सर्व अधिकारी, कर्मचारी यांना देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ३५00 ते ४000 मिलिमीटर (१४0 ते १६0 इंच) इतका पाऊस पडतो. राजापूर, संगमेश्वर, चिपळूण, खेड या तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी पूर येण्याचे प्रकार सातत्याने घडतात. अतिवृष्टीमुळेच दरडी कोसळण्याच्या घटना घडतात.दरडग्रस्त म्हणून नोंंदल्या गेलेल्या १६ गावांवर यंदा विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून, तशी आपत्ती उद्भवल्यास त्यासाठीही उपयायोजना करण्यात आली आहे. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास तेथील लोकांच्या स्थलांतराच्या दृष्टीनेही नियोजन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)