शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

तालुका समन्वय समिती जाहीर

By admin | Updated: January 10, 2015 00:12 IST

शिक्षण क्षेत्र संघटना : संप यशस्वीतेसाठी शाळांना भेट

टेंभ्ये : महाराष्ट्र राज्य शिक्षण क्षेत्र संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आंदोलनामध्ये रत्नागिरी तालुका शंभर टक्के सहभागी व्हावा, यासाठी तालुका समन्वय समिती जाहीर करण्यात आली. रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढीमध्ये आयोजित सर्व संघटनांच्या संयुक्त सभेमध्ये तालुका समन्वय समितीची निर्मिती करण्यात आली.समितीमध्ये अध्यक्ष उदय फडके, सचिव प्रकाश मांडवकर, सी. एस. पाटील, सागर पाटील, आनंद शेलार, महेंद्र कुवळेकर, प्रदीप वाघोदे, अनंत जाधव, रामचंद्र केळकर, संतोष शिंदे यांचा समावेश आहे. शासनाच्या शिक्षणविरोधी धोरणाच्या निषेधार्थ सुरु केलेले राज्यस्तरीय आंदोलन तालुक्यात १०० टक्के यशस्वी व्हावे, यासाठी समन्वय समिती व सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमार्फत तालुक्यातील सर्व शाळांना भेट दिली जाणार आहे. प्रत्येक शाळेमध्ये संपाची पार्श्वभूमी शिक्षक व कर्मचाऱ्यांना सांगितली जाणार आहे. दि. १३ च्या एकदिवसीय लाक्षणिक संपाचे नियोजन शाळांना सांगण्यात येणार आहे. सर्व शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी दि. १३ रोजी सकाळी १० वाजता जयस्तंभ, रत्नागिरी येथे एकत्र यायचे आहे, असे आवाहन समन्वय समितीकडून करण्यात आले आहे. यावेळी जगन्नाथ वीरकर, दिलीप वासनिक, रामचंद्र गराटे, सदाशिव गावडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)दि. १३चा एक दिवसाचा लाक्षणिक संप जिल्ह्यात शंभर टक्के यशस्वी होईल, असा विश्वास जिल्हा समन्वय समितीच्यावतीने मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष पी. व्ही. पाटील व माध्यमिक अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष भारत घुले यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तालुका संघटनांच्या माध्यमातून संपाचे नियोजन केले जात आहे. १३ रोजी प्रत्येक तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. तसेच तहसीलदारांमार्फतमागण्यांचे निवेदन शासनाकडे पोहोचविले जाईल. - भारत घुले