शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

अनुकंपा भरतीचा विशेष आदेश काढावा

By admin | Updated: May 23, 2015 00:35 IST

एकूण रिक्त जागांच्या ५ टक्के पदांवर अनुकंपा उमदेवारांची नियुक्ती करण्यात येत असल्याने वर्षाकाठी हाताच्या बोटावर मोजण्याएवढी भरती देखील होत नाही

कोयनानगर : अनुकंपा तत्त्वावर नोकरभरती करताना एकूण रिक्त जागांच्या ५ टक्के पदे अनुकंपा नियुक्तीने भरण्याचा निर्णय २००५ मध्ये राज्य शासनाने घेतला. त्यानुसार अनुकंपा प्रतीक्षा सूचीवरील उमेदवारांची संख्या कमी न होता ती वाढत असल्याचे स्पष्ट झाले, यामुळे उमेदवारांवर अन्याय होत असून, याबाबत विशेष शासन आदेश काढावा, अशी मागणी होत आहे. दि. २२ आॅगस्ट २००५ चा शासन निर्णय निर्गमित करण्यापूर्वी अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यासंदर्भामध्ये कोणतीही मर्यादा नव्हती. त्यामुळे ज्या कार्यालयांमधील पदे रिक्त होतील त्या कार्यालयाच्या मागणीनुसार आणि प्रतीक्षासूची वरच्या ज्येष्ठतेनुसार अनुकंपा उमेदवार नोकरभरती होत होती आणि पर्यायाने अनुकंपा उमेदवारांना फारकाळ प्रतीक्षा करावी लागत नव्हती. दि. २२ रोजीच्या शासन निर्णयामुळे एकूण रिक्त जागांच्या ५ टक्के पदांवर अनुकंपा उमदेवारांची नियुक्ती करण्यात येत असल्याने वर्षाकाठी हाताच्या बोटावर मोजण्याएवढी भरती देखील होत नाही आणि पर्यायाने प्रतीक्षासूची कमी होण्याऐवजी वाढत निघाली.काही उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडल्याने त्यांची नावे प्रतीक्षा सूचीतून कमी होताना निदर्शनास आले. प्रतीक्षा सूचितील उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना न्याय मिळणे गरजेचे असताना सरळ सेवेतून अनुकंपा तत्त्वावर भरती झाल्याने अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या या रखडल्या गेल्या. त्यामुळे अनुकंपा प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांवर अन्याय होत असल्याचे निदर्शनास उमेदवारांच्या निदर्शनास आले. आता सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयाप्रमाणे राज्य शासनाने लवकर नवीन शासन निर्णय निर्गमित करावे. २०१० पूर्वीच्या सर्व प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांची टप्प्याटप्प्याने भरती करण्याचा निर्णय घ्यावा. (वार्ताहर)